मनसेने लाॅकडाऊनमध्ये औरंगाबादेत केलीय ही मागणी

दुर्गादास रणनवरे
Friday, 1 May 2020

शहरातील ठाकरे नगर, एसटी कॉलनी, विनय कॉलनी, महाजन कॉलनी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान वॉर्ड क्रमांक ७७ येथे स्थलांतरित भाजीमंडई तातडीने हटविण्याची मागणी महराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) करण्यात आली आहे.

औरंगाबाद : शहरातील ठाकरे नगर, एसटी कॉलनी, विनय कॉलनी, महाजन कॉलनी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान वॉर्ड क्रमांक ७७ येथे स्थलांतरित भाजीमंडई तातडीने हटविण्याची मागणी महराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) करण्यात आली असून परिसरातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने येथील स्थानिक नागरिकांना मोठा त्रास होत असल्याने मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या, सर्व उद्योगांना विशेष पॅकेज द्या

शहरातील वार्ड क्रमांक ७७  एस.टी. कॉलनी ठाकरे नगर, विनय कॉलनी, महाजन कॉलनी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे २७ मार्चपासून मुकुंदवाडी येथील भाजीमंडई कोरोना व्हायरस महामारीचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे १० ते १५ दिवसासाठी भाजी मंडई स्थलांतरीत केली आहे.

शहरात कोरोना व्हायरस महामारीचा प्रादुर्भाव वाढत चालला असून संजयनगर मुकुंदवाडी या परिसरात १८ हून अधिक कोरोना संक्रमण झालेले नागरिक आढळले आहेत. याच संजयनगर, मुकुंदवाडी भागातील काहीजण छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील भाजी मंडईत भाजी विक्रीची दुकाने लावून भाजी विक्री करत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा

ही अतिशय गंभीर बाब आहे यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव वाढून या भागातील नागरिकांना याची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून येथील नागरिकात चिंतेचे वातावरण पसरले असून मानत धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे ही भाजी मंडई त्वरीत बंद करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे मनसेचे पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष अशोक पवार पाटील यांनी केली आहे.

जर ही भाजी मंडई त्वरीत बंद केली नाही व यामुळे जर कोरोना व्हायरचा संसर्ग वाढल्यास पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन यासाठी जबाबदार असतील असा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला आहे. मनसेच्या वतीने पोलीस निरीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात मनसेचे शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर, पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष अशोक पवार पाटील, रुपेश शिंदे, संदीप काळे, संदीप मिसाळ आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

ज्येष्ठांना मिळणार घरातच वैद्यकीय सल्ला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS demanding to Close Vegitables Stalls Aurangabad News