बोगस बी-बियाणे विकणाऱ्‍यांना ठोकणार..! वाचा कोणी दिला इशारा.. 

अतुल पाटील
Friday, 10 July 2020

बोगस खते आणि बी बियाणे विक्री करणाऱ्यांना प्रशासनाने रोखावे, शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी, तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी दिला आहे. तर मनसेच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. 

औरंगाबाद : बोगस खते आणि बी बियाणे विक्री करणाऱ्यांना प्रशासनाने रोखावे, शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी, तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी दिला आहे. मागणींचे निवेदन त्यांनी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनाही दिले. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

निवेदनात म्हटले कि, बोगस खते बी-बियाणे याबाबत कृषी संचालक यांना निवेदन दिले होते. तसेच कृषी अधिकारी यांनीही दखल घेण्याचे आश्वासन दिले होते परंतु, शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असताना त्याची कोणीही दखल घेतलेली नाही. यासंदर्भात पाठपुरावा करून देखील कागदोपत्री अथवा प्रत्यक्ष कुठल्याही स्वरूपाची विक्रेत्यांवर कारवाई केली नाही. कार्यालयांकडूनही उत्तर मिळाले नाही, ही गंभीर बाब आहे. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

शासनाच्या योजनेतून शेतकऱ्यांना खत आणि बी-बियाणे विक्रेत्यांकडून अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येतात. परंतु संबंधित विक्रेते हे लालसेपोटी व वैयक्तिक स्वार्थापोटी शेतकऱ्यांना बोगस दर्जाची बियाणे देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान करत आहेत. प्रत्येक शेतकरी साक्षर असेलच असे नाही. त्यांची फसवणूक होत आहे. मे २०२० या एका महिन्यातच मराठवाड्यात जवळपास १०९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याची गंभीरता ओळखून कार्यवाही व्हावी. 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

राज्याचे कृषिमंत्री यांनी जून महिन्यात औरंगाबाद येथे बोगस बियाणे, खत दुकानदार व साठेबाजी करणाऱ्या विक्रेत्यांवर छापे टाकून कारवाई केली. यानंतरही शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. पालकमंत्री म्हणून विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा मनसे अधिकाऱ्यांविरुद्ध तीव्र आंदोलन करेल, त्यांना जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही. असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे. निवेदन देताना डॉ. विलास जगदाळे, संदीप कुलकर्णी, गजन गौडा पाटील, आशिष सुरडकर यांची उपस्थिती होती. 

संपादन : प्रताप अवचार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS Hinted sell bogus fertilizers and seed