अर्भकाच्या खून प्रकरणात आईला जन्मठेपेची शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अपत्याची माहिती लपवून त्याचा खून केलेल्या मातेला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व पाचशे रुपये दंड ठोठावला.

कन्नड (औरंगाबाद) : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अपत्याची माहिती लपवून त्याचा खून केलेल्या मातेला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व पाचशे रुपये दंड ठोठावला.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कन्नड तालूक्यातील ब्राम्हणी येथील चाळीस वर्षीय महिला अनैतिक संबंधातून गर्भवती राहिली होती. नंतर तिने अर्भकाला गोणपाटाच्या पिशवीत टाकले. त्यामुळे गुदमरुन त्याचा मृत्यू झाला होता. २४ ऑक्टोबर २०१८ रोजी पोलिस पाटील राजीव उमरावसिंग नागलोद (वय ३८) यांनी कन्नड पोलिसात फिर्याद दिली होती.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यावरुन गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयात सुरवातीला अज्ञात स्त्रीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता, तपास अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तिचा शोध घेतला. यात आरोपी महिलेला २६ ऑक्टोबर २०१८ रोजी अटक केली होती. न्यायाधीश टेकाळे यांचे न्यायालयाने वरील आरोपीला गुन्हा सिध्द झाल्याने जन्मठेप व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी वकील म्हणून अनिल हिवराळे यांनी काम केले. पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलिस उपनिरीक्षक सतीष दिंडे, पोलिस नाईक किरण गंडे, कैलास करवंदे, योगेश ताठे यांनी हा तपास केला. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(Edited By Pratap Awachar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother sentenced to life imprisonment infant murder case