कत्तलखान्यातील दरवाढीला विरोध करत कर्मचाऱ्यांना कोंडले

Aurangabad City news
Aurangabad City news

औरंगाबाद ः कत्तलीचे दर का वाढविले, असा जाब विचारत खाटीक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या शहाबाजार येथील कत्तलखान्याला कुलूप ठोकले आणि पाचजणांना कोंडल्याचा प्रकार मंगळवारी (ता. चार) सकाळी घडला. सुमारे पाऊण तासानंतरही आंदोलनकर्ते कुलूप उघडत नसल्याने शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी त्यांची सुटका केली. याप्रकरणी समीर जावेद कुरेशीसह आठ जणांविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

महापालिकेचा शहाबाजार येथे कत्तलखाना आहे. याठिकाणी बकऱ्यांची कत्तल केली जाते. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रति बकरा १५ रुपये महापालिकेचे शुल्क होते. हे शुल्क आता थेट १०० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे खाटीक समाजबांधवांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी १० वाजता कत्तलखान्यात जावेद कुरेशीसह सात ते आठजण शहाबाजार येथील कत्तलखान्यावर आले. या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षक शाहेद शेख व अन्य चार कर्मचारी काम करत होते. कुरेशीसह इतरांनी आम्ही खाटीक संघटनेचे आहोत. तुम्ही कत्तलीचे दर का वाढविले? शहरात बेकायदा कत्तलविरोधी पथक पाठवून कारवाया का करता? असा जाब विचारला. त्यावर शाहेद शेख यांनी महापालिकेने ठराव घेऊन हे दर वाढविले आहेत. जे लोक बेकायदा कत्तल करतात, त्यांच्यावरच आम्ही कारवाया करतो, असे सांगितले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

मात्र, त्यांचे समाधान झाले नाही. पदाधिकाऱ्यांनी संतप्त होत, कत्तलखान्याच्या गेटला कुलूप ठोकले. पाऊण तासानंतरही कत्तलखान्याचे कुलूप उघडले जात नसल्याने श्री. शेख यांनी सिटी चौक पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्यासह पोलिसांनी कत्तलखान्यावर धाव घेऊन या सर्वांची सुटका केली. 

कत्तलीसाठी आलेल्यांना पाठविले परत 
शहरातील मांसविक्रेते याठिकाणी येऊन बकऱ्यांची कत्तल करून ते मांसविक्रीसाठी नेतात; मात्र आंदोलनकर्त्यांनी कत्तलखान्याच्या गेटला कुलूप लावून कत्तलीसाठी आलेल्यांना परत पाठविले. सिटी चौक पोलिस ठाण्यात समीर कुरेशी, युसूफ कुरेशी, फेरोज कुरेशी, मोहंमद कुरेशी, शौकत कुरेशी, मोहसीन कुरेशी, इम्रान कुरेशी या संशयितांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com