आता...लॉकडाउनमुळे घरीच घेता येईल वीज मिटर रिडींग

अनिलकुमार जमधडे
Tuesday, 5 May 2020

साडेतीन लाख लोकांनी घरीच घेतली वीज मिटर रिडींग

मोबाईलवरुन महावितरणला पाठवला मेसेज

औरंगाबाद : महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील ३ लाख ६३ हजार वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अॅपद्वारे एप्रिलचे स्वतःहून मीटर रीडिंग पाठविले आहे. या सर्व ग्राहकांना त्यांच्या वीजवापरानुसार महावितरणकडून वीजबिल दिलेले आहे. 

महावितरणने २३ मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रीडिंग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. यासोबतच वीजबिलांची छपाई करणे व त्याचे वितरणदेखील बंद करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या कालावधीत मीटर रीडिंग उपलब्ध होणे शक्य नसल्याने वीजग्राहकांना सरासरीनुसार वीजबिल पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

घरीच घ्या वीज मिटर रिडींग

महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट व ‘महावितरण’ मोबाईल अॅपद्वारे वीजग्राहकांना मीटरच्या रीडिंगचे फोटो पाठवून स्वतः रीडिंग घेण्याची सोय उपलब्ध आहे. या रीडिंगप्रमाणे वीजवापराचे अचूक बिल तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वीजग्राहकांनी मीटरच्या रीडिंगचे फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मोबाईलवर महावितरणकडून ‘एसएमएस’

वीजग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाईलवर महावितरणकडून ‘एसएमएस’ पाठविला जात असून त्यामध्ये मीटर रीडिंग पाठविण्याची मुदत नमूद करण्यात येत आहे. महावितरणच्या या आवाहनाला प्रतिसाद देत एप्रिलच्या वीजवापराचे तब्बल ३ लाख ६३ हजार १७५ वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अॅपद्वारे दिलेल्या मुदतीमध्ये मीटर रीडिंग पाठविले आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

पुणे आघाडीवर

महावितरणकडे स्वतःहून मीटर रीडिंग पाठविलेल्या वीजग्राहकांमध्ये पुणे परिमंडलामधील ६९९१२, कल्याण- ५८२१०, भांडुप- ३७५४३, नागपूर- २७७२०, नाशिक- २५८३१, कोल्हापूर- २२७२८, बारामती- २०९४१, जळगाव- १७६६४, औरंगाबाद- १६३७४, अकोला- १३७६७, अमरावती- १३५४०, चंद्रपूर- ८८२४, कोकण- ८५४२, नांदेड- ७३४८, गोंदिया- ७२६८ आणि लातूर परिमंडलामधील ६९६३ वीजग्राहकांचा समावेश आहे.

मीटर रीडिंग पाठवण्याचे आवाहन

महावितरणकडून प्रत्यक्ष रीडिंग घेण्याची प्रक्रिया सुरू होईपर्यंत वीजग्राहकांनी मोबाईल अॅप व वेबसाईटमध्ये लॉगिन करून दिलेल्या मुदतीत मीटर रीडिंगचा फोटो अपलोड करून मीटर रीडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL Electricity Meter Reading News