औरंगाबादच्या पोलिस आयुक्तपदी निखील गुप्ता, तर विशेष पोलिस महानिरीक्षकपदी के. एम.एम. प्रसन्ना

सुषेन जाधव
Thursday, 3 September 2020

औरंगाबादच्या पोलिस आयुक्तपदी निखील गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर औरंगाबाद परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी के. एम. एम. प्रसन्ना यांची बदली करण्यात आली आहे. प्रसन्ना यांच्याकडे नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदाची जबाबदारी होती.

औरंगाबाद: औरंगाबादच्या पोलिस आयुक्तपदी निखील गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर औरंगाबाद परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी के. एम. एम. प्रसन्ना यांची बदली करण्यात आली आहे. प्रसन्ना यांच्याकडे नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदाची जबाबदारी होती.

पोलिस विभागाचा राज्यभर बदल्यांचा धडाका सुरु असून बुधवारी हे बदली आदेश धडकले आहेत. शासनाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी हे आदेश काढले आहेत. चिरंजीव प्रसाद यांची नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

हे वाचलंत का?- मिनी मंत्रालयातील ऑनलाईन सभा म्हणजे 'आजार म्हशीला अन इंजेक्शन पखालीला 

ते औरंगाबादचे पोलिस आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत होते. तसेच औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंघल यांची बदली नियंत्रक वैद्यमापन शास्त्र, मुंबई येथे करण्यात आली आहे. ते विशेष पोलीस महानिरीक्षक समकक्ष पदावर काम पाहणार आहेत. औरंगाबादेत आयुक्त पदावर नियुक्त झालेले निखील गुप्ता हे केंद्रीय नियुक्तीवरून राज्यात परतले आहेत.

१५ वर्षांनी गुप्तांचे औरंगाबादेत आगमन

अत्यंत शिस्तप्रिय आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख असलेले निखिल गुप्ता हे औरंगाबादेत पोलिस उपायुक्त म्हणून २००३ ते २००५ या कालावधीत कार्यरत होते. श्री. गुप्ता हे सयुंक्त राष्ट्र संघटनेच्या शांतीसेनेत प्रतिनियुक्तीवर गेले होते. तेथून परत आल्यानंतर त्यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यानंतर ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले होते. ५ वर्षांचा कालावधी संपल्यानंतर ते महाराष्ट्र केडरमध्ये परतले आहेत.

हे वाचलंत का?- मी जप केल्यामुळे कोरोनाकाळात भारतात अमेरिकेसारखी स्थिती नाही, खैरेंचा अजब दावा  

संपादनः सुषेन जाधव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nikhil Gupta Aurangabad New Police Commisioner And K M M Prasanna IG