औरंगाबाद शहर बसची नऊ टक्के भाडेवाढ, वाचा कोणत्या मार्गावर किती आहे दर!  

माधव इतबारे
Wednesday, 4 November 2020

डिझेलच्या किमती वाढल्याने प्रतिकिलोमिटर ३.४२ रुपये वाढ 

औरंगाबाद : डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने शहर बसच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच नोव्हेंबरपासून शहर बससेवा सुरू होणार आहे. तेव्हापासून प्रतिकिलोमिटर ३.४२ टक्के एवढी वाढ तिकिटात होईल, असे मंगळवारी (ता. तीन) स्मार्ट सिटी बस विभागाचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांनी सांगितले. ही दरवाढ काही मार्गावर आठ ते नऊ टक्के एवढी आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत औरंगाबाद स्मार्टा सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने शहर बस सेवा सुरू केली आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बसचे तिकीट अत्यल्प ठेवण्यात आले होते. मात्र कोरोना काळात बंद असलेल्या शहर बस सुरू करताना तिकिटात वाढ करण्याचा निर्णय कार्पोरेशनने घेतला आहे. श्री. भुसारी यांनी सांगितले की, इंधन खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर पूरक खर्चांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन दर सुधारित करण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत डिझेलच्या दरात प्रतिलीटर १६.५१ रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ २८ टक्क्यांनी आहे. त्यामुळे बससेवेच्या प्रत्येक किलो मीटरच्या किमतीमध्ये जानेवारी २०१९ च्या तुलनेने ३.४२ रुपये वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे एकूण कामकाजाच्या किमतीत ७.६१ टक्के वाढ झाली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

असे असतील नवे दर 

 • -रेल्वेस्टेशन ते शहागंज १५ रुपये 
 • -रेल्वेस्टेशन ते हर्सुल सावंगी २५ रुपये 
 • -रेल्वे स्टेशन ते हर्सुल टि पॉर्इंट २५ रुपये 
 • -रेल्वेस्टेशन ते सिडकोमार्गे एम-२ फेरीसाठी २५ रुपये 
 • -औरंगपुरा ते रांजणगावमार्गे सेंट्रल बसस्टँड २५ रुपये 
 • -औरंगपुरा ते बजाजनगरमार्गे सेंट्रल बसस्टँड २५ रुपये 
 • -औरंगपुरा ते हिंदुस्थान आवासमार्गे सेंट्रल बसस्टँड २५ रुपये 
 • -औरंगपुरा ते वाळूजमार्गे सेंट्रल बसस्टँड २५ रुपये 
 • -औरंगपुरा ते शिवाजीनगरमार्गे सेंट्रल बसस्टँड २० रुपये 
 • -सिडको ते जोगेश्वरीमार्गे बाबा पेट्रोलपंप ३५ रुपये 
 • -सिडको ते विद्यापीठमार्गे क्रांतीचौक २५ रुपये 
 • -सिडको ते रेल्वेस्टेशनमार्गे बीडबायपास २५ रुपये 
 • -चिकलठाणा ते रांजणगावमार्गे बाबा पेट्रोलपंप ३० रुपये 
 • -औरंगपुरा ते बजाजनगरमार्गे सेंट्रल बसस्टँड २५ रुपये 
 • -रेल्वेस्टेशन ते रेल्वेस्टेशनमार्गे सिडको हर्सुल टी पॉर्इंट ३० रुपये 
 • -सिडको ते रांजणगाव मार्गे एम-२ फेरीसाठी ३५ रुपये 
 • -रेल्वेस्टेशन ते चिकलठाणामार्गे एसएससी बोर्ड २५ रुपये 
 • -रेल्वेस्टेशन ते भावसिंगपुरामार्गे क्रांतीचौक २० रुपये 
 • -रिंग रोड रेल्वेस्टेशनमार्गे सेव्हनहिल ३० रुपये 
 • -रेल्वेस्टेशन ते औरंगाबाद लेणीमार्गे टाऊन हॉल २० रुपये 
 • -मुकूंदवाडी रेल्वेस्टेशन ते बाबा पेट्रोलपंपमार्गे एन-३ साठी २० रुपये 
 • -सेंट्रल बसस्टँड ते बिडकीन ३५ रुपये 
 • -सेंट्रल बसस्टँड ते फुलंब्री ४० रुपये 
 • -सेंट्रल बसस्टँड ते वेरूळ ४५ रुपये 
 • -सेंट्रल बसस्टँड ते करमाड ३५ रुपये

खाली दिलेल्या निळ्या लिंकवर अवश्य क्लिक करा

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine per cent hike in city bus fares Aurangabad news