esakal | आमिष दाखवून तरुणाला साडेनऊ लाखांचा गंडा, वाळूजमधील प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_33

सॉफ्ट ड्रिंक व खाद्य पदार्थांची एजन्सी देण्याचे आमिष दाखवत वेळोवेळी पैसे घेऊन तरुणाला साडेनऊ लाखांचा गंडा घातला. हा प्रकार मंगळवारी (ता.२२) उघडकीला आला.

आमिष दाखवून तरुणाला साडेनऊ लाखांचा गंडा, वाळूजमधील प्रकार

sakal_logo
By
रामराव भराड

वाळुज (जि.औरंगाबाद) : सॉफ्ट ड्रिंक व खाद्य पदार्थांची एजन्सी देण्याचे आमिष दाखवत वेळोवेळी पैसे घेऊन तरुणाला साडेनऊ लाखांचा गंडा घातला. हा प्रकार मंगळवारी (ता.२२) उघडकीला आला. अक्षय सतीश छाजेड (रा.सिडको वाळूजमहानगर) या तरुणाने आनंद ट्रेडींग कंपनी या नावाने खाद्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी परवाना काढला आहे. त्याच्या ओळखीचे संतोष राऊत यांनी खाद्य पदार्थ विक्रीची एजन्सी चालविणाऱ्या दिपककुमार सिन्हा रा. खारघर जि. रायगड याची ओळख करून दिली.

त्यानंतर अक्षय यांनी ८ जुलै रोजी दिपककुमार याच्या मोबाईल वरून संपर्क साधून चौकशी केली. यावेळी दीपककुमार याने आपली एकांश इंटरप्राजयेस (बडोदरा, गुजरात) या नावाची मार्केटिंग कंपनी असून औरंगाबाद येथे होलसेलर माल देणाऱ्या एजन्सीची नेमणुक करायची आहे. अशी थाप मारीत तुमच्या कपंनीला सुपर स्टॉकीस्ट म्हणुन काम देवू असे म्हणत अक्षय यांच्या मेलवर करारनामा पाठवून दिला. त्या करारात गोदामाचे भाडे, एका व्यक्तीचा पगार व इतर खर्च देण्याचे सांगत टोकन म्हणून पाच लाख रुपये भरण्यास सांगितले.

त्यांनतर अक्षय यांनी ५ लाख रुपये एकांश इंटरप्रायजेस कंपनीच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे जमा केले होते. यानंतर दीपककुमारने करारनामा करण्यासाठी आणखी ७ लाखाचा खर्च येणार असल्याचे सांगितल्याने अक्षय यांनी दीपककुमारच्या खात्यावर ९ लाख ५० हजार रुपये जमा केले. ११आँगस्टला दीपककुमार बजाजनगरात आल्यानंतर अक्षयने त्याची भेट घेतली. पैसे भरुनही मालाचा पुरवठा व करारनामा करीत नसल्याने अक्षय यांने दिपककुमार यास पैसे परत देण्याची मागणी केली.

त्यांनतर दिपककुमारने ५ डिसेंबरला अक्षय यांना पाच लाखांचा धनादेश दिले. मात्र बॅकेत पैसे नसल्यामुळे धनादेश वटले नाहीत. दोन दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्रात नोकरीच्या बहाण्याने दिपककुमारने मुंबईतील तरुणांना १ कोटीचा गंडा घातल्याची बातमी वाचली. त्यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अक्षय यांनी दिपककुमारविरूध्द वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
 

Edited - Ganesh Pitekar