शाळांचा अजब कारभार : ऑनलाईन तासिका न घेता थेट परीक्षा! 

संदीप लांडगे
Saturday, 24 October 2020

शिकवले नसतानाही शहरातील अनेक शाळांचा अजब कारभार 

औरंगाबाद : कोरोनामुळे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे अनेक शाळांनी ऑनलाईन तासिका घेतल्या. आता विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेतली जात आहे. मात्र, काही शाळांनी मागील चार महिन्यांपासून मुलांनाच काहीच शिकवलेले नसताना थेट ऑनलाईन चाचणी परीक्षेची लिंक पाठवली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोनामुळे शासनाने शाळा बंद शिक्षण सुरु असा उपक्रम राज्यभरात सुरु केला. मात्र, अनेक शाळांनी शासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवली. शिक्षकांनी फक्त नावालाच विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले. त्यात युट्यूबवरील कोणतेही शैक्षणिक व्हिडीओ टाकून मुलांना शिकवत असल्याचे दाखवले. मुलांना आभ्यासात येणाऱ्या अडचणीकडे कोणत्याही शिक्षकांनी लक्ष दिले नाही. ज्यावेळी लक्षात आले, तेंव्हा शासनाने शिक्षकांकडे शैक्षणिक कामकाजाचा आढावा मागीतला. त्यामुळे ज्या शिक्षकांनी कोरोनाच्या काळात काहीच काम केले नाही. अशा शिक्षकांची गोची होवू लागली आहे. या कामचुकार शिक्षकांनी शिक्षक संघटनांना हाताशी धरत हा आदेश रद्द करण्यासाठी शासनाकडे दबाव टाकायला सुरुवात केली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोणती परीक्षा घेताहेत? 
शिक्षण विभागाने अद्याप परीक्षा घेण्याबाबत कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. मात्र, काही ज्या शाळांनी मागील चार महिन्यात एकदाही विद्यार्थ्यांचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन तासिका घेतली नाही. अशा शाळांकडून विद्यार्थ्यांना दररोज सकाळी आठ वाजताच ऑनलाईन परीक्षेची लिंक पाठवण्यात येत आहे. शिक्षकांनी पाठवलेल्या लिंकमध्ये कोणत्या प्रश्‍नाचे काय उत्तर लिहावे? हे विद्यार्थ्यांना कळतच नाही. कारण शिक्षकांनी कधी विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिकवलेच नाही. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

इंटरनेट रेंजला औषध नाही 
घरात रेंज मिळत नाही म्हणून विद्यार्थी घराच्या छतावर बसून लिंकवर पाठवलेली प्रश्‍नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या पालकांकडे मोबाईल नाही, त्यांची मुलं शिक्षणापासून व परीक्षेपासून वंचित राहात आहेत. त्यांच्या परीक्षा घेण्याबाबत कोणत्याही शाळेकडून खास असे नियोजन करण्यात आलेले नाही. 

जून महिन्यांपासून शिक्षक निद्रावस्थेत 
शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना जूनपासूनच ऑनलाईन पद्घधतीने शिकवावे अशा सूचना शाऴांना दिल्या आहेत. तरी देखील बहुतांश शाळांनी याकडे दुर्लक्ष केले. काही शिक्षकांना शालेच्या व्यवस्थापनाने व मुख्याध्यापकांनी ऑनलाईन शिक्षण घेण्याच्या सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. मागील चार महिन्यात प्रत्येक विषयाचे किमान चार प्रकरण (धडा) शिकवून होणे. अपेक्षित होते. परंतु शिक्षकांनी केवळ झोपेचे सोंग घेतले आहे. अशी पालकवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.  

(संपादन-प्रताप अवचार) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No online education start exams aurangabad news