esakal | बुद्धिबळाच्या पटावर फुटबॉल खेळणार नाही; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टाेला
sakal

बोलून बातमी शोधा

amc aurangabad

हिंदूत्व सोडणार नाही, हातातला भगवा सोडणार नाही. ते मुफ्ती महंमद सोबत जाऊ शकतात मग आम्हालाही स्वातंत्र्य आहे. ते बुद्धिबळ खेळत असतील तर मीसुद्धा बुद्धिबळाच्या पटावर फुटबॉल खेळणार नाही'', असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता लगावला.

बुद्धिबळाच्या पटावर फुटबॉल खेळणार नाही; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टाेला

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद-""महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. शिवसेनेने त्यांना हिंदुत्वाची दिशा दाखवली; मात्र मित्राचा त्यांनी घात केला, ते बुद्धिबळ खेळत असतील तर मी बुद्धिबळाच्या पटावर फुटबॉल खेळणार नाही'', असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. 

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शुक्रवारी (ता. दहा) झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बदल्या, बढत्यांसाठी माझ्याकडे येऊ नका, असे फर्मानही त्यांनी यावेळी सोडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांपासून औरंगाबाद दौऱ्यावर होते. मराठवाड्यातील जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, ""आता नवीन घरोबा झाला आहे. हा घरोबा करताना तुमच्या प्रमाणे माझी मानसिकताही संमिश्र होती; पण एका बाजूला साखरेला लावलेले विष आणि दुसऱ्या बाजूला नुसतेच विष ठेवलेले असेल तर काय करणार? भगवान शंकरानेसुद्धा हलाहल पचवलेच होते, आम्हीही पचवू. नवी आघाडी केली याचा अर्थ आम्ही हिंदूत्व सोडले असा नाही.

हिंदूत्व सोडणार नाही, हातातला भगवा सोडणार नाही. ते मुफ्ती महंमद सोबत जाऊ शकतात मग आम्हालाही स्वातंत्र्य आहे. ते बुद्धिबळ खेळत असतील तर मीसुद्धा बुद्धिबळाच्या पटावर फुटबॉल खेळणार नाही'', असा टोला ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता लगावला. ""पुढील निवडणुकांचा आराखडा तयार करा, राजकीय चाणाक्षपणा आपल्याकडे असला पाहिजे'', असे असा सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे, त्याची तयारी करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. 

मिळेल ती खुर्ची घ्या 
उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार उशिराने आले. त्यांना व्यासपीठावर खुर्ची नव्हती. काहींनी त्यांना खुर्ची देण्यासाठी धावपळ सुरू केली. हा प्रकार पाहून ठाकरे यांनी सत्तारांना उद्देशून आणि शिवसेनानेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे पाहात, मिळेल ती खुर्ची घ्या आणि बसा, खुर्चीवरून उगीच वाद नको, असे ठाकरे म्हणाले. 
 
बदल्या, नोकरीची शिफारस घेऊन येऊ नका 
तुमच्यामुळेच शिवसेनेला आज हे दिवस दिसत आहेत. संघटनेसाठी काम करत असताना आपले घर, प्रपंचसुद्धा व्यवस्थित चालावा यासाठी उद्योग, संस्था उभारा, स्वतःही सक्षम व्हा, आणि इतरांना रोजगार द्या मात्र; मुंबईत माझ्याकडे नोकरीची शिफारस किंवा बदल्यांसाठी येऊ नका असे फर्मान ठाकरे यांनी सोडले. 

हेही वाचा -

साहित्य संमेलनात वादग्रस्त पुस्तकाची विक्री, प्रकाशक-पोलिसांमध्ये वाद

प्रत्येक तालुक्यात पुस्तक विक्री केंद्र सुरू करा, विक्रेत्यांची मागणी

  Video : अशी निघाली साहित्याची उस्मानाबादेत ग्रंथदिंडी

धर्म आणि साहित्याची गल्लत नको : महानोर