अधिकाऱ्यांच्या साक्षीनेच फिजीकल डिस्टन्सचा फज्जा

राजेभाऊ मोगल
सोमवार, 29 जून 2020

कच्या मालाच्या किंमतीमध्ये घट झालेली असताना केंद्र सरकारने देशात मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेल या इंधन दरवाढ केली आहे. या निषेधार्त जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे सोमवारी (ता.२९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी फिजीकल डिस्टन्स पाळले जावे, असे सरकारतर्फे वारंवार आवाहन करीत आहे. मात्र, सोमवारी (ता.२९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच विविध आंदोलनादरम्यान बंदोबस्तावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या साक्षीने फिजीकल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान   

मोजक्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी लांब उभे राहुन आंदोलन करण्याऐवजी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र होते. आंदोलनाचा समारोप झाल्यानंतर केवळ ऐकमेकांनी गळाभेट घेण्याचेच राहीले होते. कार्यकर्ते एवढ्या दाटीवाटीत उभे होते, की कुणालाच कोरोनाची भिती राहीलीच नाही, असे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसुन येत होते. या प्रकाराबद्दल कारवाईकरण्याऐवजी प्रशासनात नुसतीच पोकळ चर्चा सुरु होती.

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात.. 

इंधन दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन
कच्या मालाच्या किंमतीमध्ये घट झालेली असताना केंद्र सरकारने देशात मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेल या इंधन दरवाढ केली आहे. या निषेधार्त जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे सोमवारी (ता.२९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले, मागील काही दिवसांपासुन कच्चा मालाच्या किंमतीमध्ये घट झालेली आहे. मात्र, केंद्र सरकार सतत जनतेला लुटण्याचे काम करीत आहे.

हेही वाचा : लाॅकडाऊन हटवताना अशी घ्यावी काळजी - डाॅ. अजित भागवत  

आपला आर्थिक बोजा देशातील गरीब व सर्वसामान्य माणसांवर टाकला जात आहे. सद्या कोरोना महामारी, लॉकडाऊन, आर्थिक मंदी या सर्व कारणांमुळे सामान्य जनता हैराण आहे. सामान्य माणसाला दिलासा देण्याऐवजी सरकार लुटण्याचे काम करीत आहे. तातडीने इंधन दरवाढ रद्द करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात केली. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ 

या आंदोलनात शहराध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मिना शेळके, चंद्रभान पारखे, किरण पाटील डोणगावकर, प्रकाश मुगदिया, भाऊसाहेब जगताप, राहुल सावंत, सरोज मसलगे, अकिल पटेल, रामराव शेळके, डॉ. जितेंद्र देहाडे, गौरव जैस्वाल, संदीप बोरसे, काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विलास औताडे, शहराध्यक्ष अल्ताफ पटेल, प्रियंका खरात, निलेश पवार, कैलास उकिरडे, गोविंदराव गायकवाड, काकासाहेब इथर उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officers Not Aware About Social Distance Aurangabad News