CoronaUpdate: औरंगाबादेत बाधितांचा आलेख वाढताच, रोजच होतेय शंभरी पार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

आतापर्यंत सर्वात जास्त १७० रुग्ण रविवारी (ता.२१) एकाच दिवशी आढळून आले. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी (ता.२२) सकाळच्या सत्रात १०२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आता एकूण १ हजार ४७३ रुग्णावर उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद : आतापर्यंत सर्वात जास्त १७० रुग्ण रविवारी (ता.२१) एकाच दिवशी आढळून आले. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी (ता.२२) सकाळच्या सत्रात १०२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आता एकूण १ हजार ४७३ रुग्णावर उपचार सुरु आहेत.
सोमवारी (ता.२२) १०२ रूग्णांची भर पडल्याने आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ६३२ झाली आहे. यापैकी १ हजार ९६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत १९१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 हेही वाचा- माझं लेकरु तहसीलदार झालं, हे कळलं तेव्हा मी रानात होते, मग काय इतका आनंद झाला म्हणून सांगू....

आज आढळलेले १०२ रुग्ण (कंसात रुग्ण संख्या)
बारी कॉलनी (१), वाळूज (३), गजानन नगर (३), गजगाव, गंगापूर (१), न्याय नगर, गारखेडा परिसर (१), मयूर नगर (३), सुरेवाडी (१), शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी (२), भाग्य नगर (५), एन - अकरा, सिडको (२), सारा वैभव, जटवाडा रोड (२), जाधववाडी (२), मिटमिटा (३), गारखेडा परिसर (३), एन - सहा, संभाजी पार्क (१), उस्मानपुरा (१), बजाज नगर, वाळूज (२), आंबेडकर नगर, एन - सात (१), भारत नगर, एन- बारा, हडको (१),

उल्का नगरी, गारखेडा (१), नॅशनल कॉलनी (१), नागेश्वरवाडी (२), संभाजी कॉलनी (१), आनंद नगर (१), अयोध्या नगर, सिडको (१), शिवाजी कॉलनी, मुकुंवाडी (३), संत ज्ञानेश्वर नगर (१), राजे संभाजी कॉलनी (४), मुकुंदवाडी (१), न्यू पहाडसिंगपुरा, जगदीश नगर (१), काल्डा कॉर्नर (१), एन- सहा, मथुरा नगर (१), नवजीवन कॉलनी, हडको, एन- अकरा (४), एन - अकरा (२), टीव्ही सेंटर (४), सुदर्शन नगर (१), दीपचैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (५), जय भवानी चौक, बजाज नगर (२),

हेही वाचा: आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार

महादेव मंदिर परिसर, बजाज नगर (१),  शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), सारा वृंदावन हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (३), स्वेदशिप हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (३), फुले नगरी, पंढरपूर (३), पंचमुखी महादेव मंदिराजवळ (१), करमाड (३), मांडकी (२), पळशी (४), शिवाजी नगर, गंगापूर (४), भवानी नगर, गंगापूर (१) या भागातील कोरोना बाधित आहेत. यामध्ये यामध्ये ४९ स्त्री व ५३ पुरुष आहेत.

असा आहे कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण - १९६८
उपचार घेणारे रुग्ण - १४७३
एकूण मृत्यू         - १९१
एकूण रुग्णसंख्या - ३६३२

हेही वाचा- Video: ‘ती’ राबते, सर्वांचे मन जपते पण तिच्या मनासारखं होतं का?  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Hundread Two CoronaVirus Positive Patient Today Aurangabad News