निर्भयासारखे हाल करेन म्हणत तब्बल तीन महिने केले अत्याचार, व्हिडीओ काढून ब्लकमेलही करायचा.

arrest Crime News
arrest Crime News

औरंगाबाद : अश्‍लिल व्हिडीओ तयार करुन तो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत संशयिताने तरुणीवर अत्याचार केला. तसेच तिने गर्भपातच्या गोळ्या खाण्यास विरोध केल्यामुळे त्या तरुणीला "तुझ्यावर सामूहिक अत्याचार करून दिल्लीतील निभर्यासारखे हाल करु' अशी धमकी देत गर्भपात करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद उमर मोहम्मद जावेद (24. रा. परभणी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. 

या प्रकरणातील आरोपीचा मामा मोहमद इस्माईल मोहमंद अश्रफ (40, रा. मकसुद कॉलनी) आणि नुर मोहम्मद अब्दुल कादर (32, रा. जटवाडा) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने दोघांनाही शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
आरोपी मोहम्मद उमर याची शहरातील 25 वर्षीय तरुणीसोबत ओळख झाली होती. उमरने तिच्याशी जवळीक साधत जुलै 2019 मध्ये ज्यूसमध्ये गुंगीचे औषध टाकत तिच्यावर अत्याचार केला, तसेच त्याचे छायाचित्रणही केले. छायाचित्रण दाखवून तिच्यावर ऑक्‍टोबर 2019 पर्यंत वेळोवेळी अत्याचार केले. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मोहम्मद उमर अश्‍लिल व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत असे. 

दरम्यान तरुणीने गर्भवती राहिल्याचे उमरला सांगितल्यानंतर उमरने तरुणीला त्याच्या मामाच्या घरी नेले. त्यावेळी त्या दोघांनी तिला गर्भपात करण्याच्या गोळ्या खाण्याचा सल्ला दिला, नाही खाल्ल्यास तुझ्यावर सामूहिक अत्याचार करून दिल्लीतील निभर्यासारखं हाल करु' असे धमकावत तिला बळजबरीने गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात केला. तक्रारीवरुन सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अनिता फसाटे यांच्या पथकाने मोहम्मद इस्माईल, नुर मोहम्मद या दोघांना रविवारी (ता.26) अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता.31) पोलिस कोठडी सुनावली. 

पोलिस कोठडीत रवानगी 
मुख्य सुत्रधार मोहम्मद उमर याला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे पाटील यांनी शुक्रवारपर्यंत (ता.31) पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकील शहनाज दुर्राणी यांनी मोहम्मद उमरच्या ताब्यातून अश्‍लिल व्हिडीओ जप्त करावयाची आहे, तरुण आणि तरुणीची वैद्यकीय तपासणी करावयाची आहे, गर्भपाताच्या गोळ्या कुठन आणल्या होत्या याचा शोध घ्यावयाचा असल्यामुळे पोलिस कोठडी देण्यात यावी अशी विनंती केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com