esakal | दरोडेखोरांच्या हल्ल्यात प्रियशरण महाराज जखमी!
sakal

बोलून बातमी शोधा

Navnath idhate.jpg

चौका ते लाडसावंगी रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्रीची घटना 

दरोडेखोरांच्या हल्ल्यात प्रियशरण महाराज जखमी!

sakal_logo
By
नवनाथ इधाटे

फुलंब्री (औरंगाबाद) : चौका ते लाडसावंगी रस्त्यावर असलेल्या आश्रमात प्रियशरण महाराज यांच्यावर अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांनी हल्ला केल्याने महाराज जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता.१०) मध्यरात्री घडली. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रियशरण महाराज हे मुळचे राजस्थान येथील आहेत. गेल्या काही वर्षा पासून त्यांनी या परिसरात आश्रम सुरु केला आहे. याशिवाय येथे गो-शाळाही ते चालवितात. त्यांच्या आश्रमात महिला व पुरुष असे सेवक आहेत. आश्रमानजीक शेती आहे. येथे काम करणारे त्यांचे अनुयायी राहतात. त्यांचा जास्त वेळ बाहेर गावी सत्संग करण्यात जातो. चौक्यापासून तीन किमीवर लाडसावंगी रस्त्यावर सताळा गावाच्या हद्दीत उंच डोंगरावर प्रियशरण महाराज यांचा आश्रम आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मंगळवारी मध्यरात्री अज्ञात सात ते आठ दरोडेखोर आले. त्यांनी इमारतीचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. पहिल्या खोलीत एक महिला झोपली होती, तिला धमकावले. महाराज कुठे आहे म्हणून विचारणा केली, तिने महाराज वरच्या मजल्यावर असल्याची माहिती दिली असता त्या लोकांनी वरच्या मजल्यावर जाऊन महाराज यांना मारहाण केली. यात महाराज व अज्ञात लोकांमध्ये झटापट झाली. यात प्रियशरण महाराज जखमी झाले. त्यांना औरंगाबाद येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच फुलंब्री पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व गुन्हा दाखल केला. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)