पर्यटनातून रोजगाराला चालना ! 

लेणी २.jpg
लेणी २.jpg

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेतील पर्यटनस्थळाचा जागतिक वारसात समावेश आहे. लेण्यांसह गौताळा, म्हैसमाळ, जंजाळा, जोगेश्‍वरीसह अनेक नैसर्गिक पर्यटनस्थळे आहेत. त्यांचा प्रसार होणे गरजेचे आहे. अडगळीत पडलेल्या या स्थळांपासून रोजगार आणि जिल्‍ह्याची भरभराट होऊ शकते. 


१९८३ मध्ये ताजमहालपूर्वी युनेस्कोने अजिंठा-वेरूळ लेणीस वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा बहाल केला आहे. अजिंठा-वेरूळसह दख्खनच्या ताजचे मार्केटिंग होणे गरजेचे आहे. पर्यटन मंत्रालयाच्या संकेतस्थळावर ताजमहल व वेगवेगळे दरवाजे (गेट्स) आणि चांदमिनारला स्थान देण्यात आले आहे; मात्र अजिंठा-वेरूळ लेण्यांना स्थान नाही. मोठी क्षमता असूनही मराठवाड्यातील लेण्या इतर पर्यटनस्थळांचा प्रॉपर मार्केटिंग होत नाही. पर्यटनाचा योग्य वापर केल्यास औरंगाबादचे पर्यटनकल्चर वाढीस मदत होईल. वेरूळ-अजिंठा लेणी व्यतिरिक्त इतर पर्यटनस्थळे बिबी-का-मकबरा, पानचक्की, म्हैसमाळ, सूलिभंजनसह वेगवेगळे धार्मिक स्थळे हे पर्यटनस्थळांना जोडावीत.  

सांस्कृतिक पर्यटनास मोठा वाव 
जिल्ह्याच्या पर्यटनवारीला येणाऱ्या पर्यटक किमान दोन ते तीन दिवस औरंगाबादेत थांबले पाहिजेत, त्या दृष्टीने खाद्य पर्यटन, शहरातील नान रोटी, तारा पान, इमरती यासह येथील खाद्य संस्कृतीची जोड देण्याची गरज आहे. यासह बंद पडलेले वेरूळ महोत्सवसह शारंगदेव महोत्सव व इतर महोत्सवाचेही दर्शन या पर्यटकांनी केल्यास पर्यटन संस्कृती वाढीस मोठी मदत होईल. येथील पैठणी, नक्षीकामही पर्यटकांपर्यंत पोचावीत. औरंगाबादेत औद्योगिक क्षेत्र मोठे आहे. हे ऑटोमोबाईलचे हब बनले आहे. 


पर्यटन क्षेत्राचा प्रॉपर प्रसार आणि प्रचार करणे गरजेचे आहे. कृषी पर्यटन, उद्योग, खाद्य, सांस्कृतिक व आरोग्य पर्यटनाची जोड दिल्यास शहरात आलेला पर्यटक दोन ते तीन दिवस रमेल. यातून रोजगार निर्मिती होईल. शहराच्या अर्थकारण वाढेल. यासह जिल्ह्यातील दुर्लक्षित असलेले किल्ले, लेण्या, ऐतिहासिक मंदिरे, म्हैसमाळ, गौताळा अभयारण्यासारख्या नवीन ठिकाणावर पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करावेत. यासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पर्यटनाची आवड असलेल्यांनी पुढे येण्याची गरज आहे. आम्ही प्रयत्न करतोय, तुम्हीही यात सहभागी होत औरंगाबाद जिल्ह्याचा पर्यटनातून विकास साधावा. 
-जसवंतसिंग राजपूत, अध्यक्ष, टुरिझम डेव्हलपमेंट फोरम 

Edit- Pratap Awachar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com