शेतकऱ्यांनो, नेवैद्य दाखवल्यासारखे देऊ नका खते, पेरणीसोबतच द्या, ही वापरा पद्धत

सुषेन जाधव
शनिवार, 27 जून 2020

वेळेत पाऊस पडल्याने यंदाच्या खरीपाची चांगली सुरवात झाली आहे. असे असले तरी पीके लागवड करुन काही ठिकाणी २० दिवस तर कुठे १५ दिवस झाले आहेत. या दिवसात शेतकऱ्यांनी कोळपणी व खुरपणीसोबतच रासायनिक खतांची मात्रा द्यायला सुरवात केली आहे.

औरंगाबाद: वेळेत पाऊस पडल्याने यंदाच्या खरीपाची चांगली सुरवात झाली आहे. असे असले तरी पीके लागवड करुन काही ठिकाणी २० दिवस तर कुठे १५ दिवस झाले आहेत. या दिवसात शेतकऱ्यांनी कोळपणी व खुरपणीसोबतच रासायनिक खतांची मात्रा द्यायला सुरवात केली आहे.

हेही वाचा- बहिणीच्या जीवासाठी ती सहन करायची बलात्कार, एकदा केमिकल कंपनीजवळ त्याने बोलावले अन..

मात्र बहूतांश शेतकरी रासासनियक, जैविक खते देताना पिकाच्या झाडाजवळ सर्व बाजूंनी गोल टाकत आहेत, नंतर कोळपणीद्वारे झाकले जात आहे. मुळात ही पद्धत चुकीची असून कपाशीसारख्या पिकाला ४० टक्के नत्र, संपूर्ण स्फूरद व पालाश रासायनिक खताची मात्रा लागवडीदरम्यान पेरुन देणं गरजेचे असल्याचे मत केव्हीकेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे यांनी मांडले. 

डॉ. झाडे यांच्या मते, कपाशीच्या उभ्या पिकात फक्त उर्वरित नत्र दोन समान हप्त्यात लागवडीच्या एक महिन्यानंतर व दोन महिन्यानंतर देणे गरजेचे आहे. यामुळे खत व्यवस्थापनाचा अवाजवी खर्च होणार नाही, दिलेल्या खताची मात्रा योग्य प्रमाणात योग्य वेळेस पिकाला उपलब्ध होऊन निव्वळ उत्पन्नात वाढ होईल असेही ते म्हणाले. 

हेही वाचा- अंगणात लावले चंदनाचे झाड, २२ वर्षाचे झाल्यावर पोलिसांना लागले काम

हा गैरसमज काढून टाका

बहूतांश वेळेस पीक लागवड करताना वेळेचे नियोजन नसणे, मजूरांचा अभाव असतो. त्यासोबतच लागवडीसोबत खते पेरल्यानंतर पिकांची उगवण कमी होते, बियाणे अंकूरण कोमेजून जाते हा शेतकऱ्यांचा गैरसमज आहे. वास्तविक अशी परिस्थिती नसते असेही डॉ. झाडे यांनी सांगितले. त्याऐवजी पेरणी करताना खते दिल्यास बियाण्याच्या खाली किंवा बाजूला (तीन ते चार सेंटीमीटर) खत पडते. त्याचा फायदाच होत असतो, कारण पिकाच्या सुरवातीच्या वाढीसाठी (मुळांना) स्फूरद या अन्नद्रव्यची गरज असते.

त्यामुळे जर लागवडीनंतर आणि स्फूरद आणि पालाश उपलब्ध होण्यासाठी ३० दिवसापेक्षा जास्त दिवस लागतात. त्यामुळे लागवडीनंतर जर खत टाकले तर मुळांची वाढ मंदावते, झाडांची मुळेच जर सशक्त नसतील तर झाड जोपासले जात नाही. तसेच नत्र या अन्नद्रव्याची कमतरता असेल तर मुळाची, झाडाची वाढ थांबते, नविन फूट येत नाहीत.  तसेच पिकांमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण करणाऱ्याचे काम करणारे पालाशही उशिरा दिल्यास पिकांना गरज असते तेव्हा मिळत नसल्याची माहिती शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. पवार यांनी दिली. 

हेही वाचा- सोयाबीन न उगवल्याची खंडपीठाकडून गंभीर दखल, तक्रारी नोंदवून थेट गुन्हे दाखलचे आदेश

ही पद्धत टाळाच 
कापूस पिकाला १०:२६:२६, २०:२०:००:१३, १८:४६:००, युरीया, १५:१५:१५, १२:३२:१६, सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश यासोबतच काही शेतकरी सिटी कंम्पोस्ट, निबोंळी पेंड किंवा जैविक खत मार्केटमध्ये उपलब्ध असलेले पिकाजवळ हाताने एका ठिकाणी किंवा सर्व बाजुनी गोल टाकतात, नंतर कोळपणीद्वारे खत झाकतात ही पद्धत चुकीची असून पेरणीदरम्यानच खतांची पेरणी करावी असेही आवाहन डॉ. झाडे यांनी केले आहे. मका पिकालाही लागवडीदरम्यानच खते द्यावीत.

युरियाचा अतिरेक वापर टाळावा, युरियाच्या अतिवापरामुळे पिकांची केवळ कायिक वाढ होते, परंतू अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे जास्त वापर टाळावा.
- डॉ. एस. बी. पवार, सहयोगी संचालक, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प.

हेही वाचा: व्याज कापल्याशिवाय बॅंका देईनात पीककर्ज, खरीपात कशी करु पेरणी म्हणत शेतकरी थेट खंडपीठात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proper Method of Fertilizer Dose At The Time Of Sowing Aurangabad News