राज ठाकरे येणार मेळाव्यानंतर औंरंगाबाद जिल्हा दौऱयावर

aurangabad news
aurangabad news

औरंगाबाद- महापालिकेच्या संपूर्ण 115 वॉर्डात निवडणूक लढण्याची तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. गुरुवारी (ता. 23) मुंबईतील पहिला मेळावा झाल्यानंतर येत्या आठ दिवसात पक्षप्रमुख राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत, असे शहर जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी मंगळवारी (ता. 21) सांगितले. 

पत्रकार परिषदेत श्री. खांबेकर पुढे म्हणाले, की पक्षाचा मेळावा गुरुवारी मुंबईत होणार आहे. राज ठाकरे यावेळी पक्षाच्या धोरणात्मक वाटचालीबद्दल अनेक प्रस्ताव सादर करणार आहेत. पक्षाची धोरणे बदलत असल्यामुळे अनेक जण पक्षात प्रवेश करत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे, शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजन यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पक्ष कात टाकत असल्याचे श्री. खांबेकर यांनी सांगितले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच 115 वॉर्डात निवडणूक लढण्याची तयारी पक्षाने केली आहे.

शहरात पक्षाच्या 78 शाखा आहेत तर जिल्ह्यात सुमारे पाचशे शाखा आहेत. त्यामुळे आमदार, खासदाराची निवडणूक पक्ष लढवू शकतो. गुरुवारी होणाऱ्या मेळाव्याला जिल्ह्यातून एक हजार 298 पदाधिकारी जाणार आहेत, असे खांबेकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सतनामसिंग गुलाटी, गजेंद्र गोडापाटील, आशीष सुरडकर, अब्दुल रशीद, राजीव जावळीकर, मंगेश सालवे यांची उपस्थिती होती. 

मेलवर दिले प्रस्ताव 
पक्षाची आगामी काळातील धोरणे ठरविण्यासाठी पदाधिकाऱ्यांना इ-मेल आयडी देण्यात आले होते. त्यावर प्रस्ताव देण्यात आले आहेत. औरंगाबाद शहराच्या विकासासाठी अनेक प्रस्ताव राज ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे खांबेकर यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com