RB Group will perform in Auric City Five hundred crore investment
RB Group will perform in Auric City Five hundred crore investment

आरबी ग्रुप करणार पाचशे कोटींची गुंतवणूक

Published on

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई कॉरिडार(डीएमआयसी) मध्ये गुंतवणूक येण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी विविध कंपन्यांशी बोलणी झाली आहे. यातीलच एक इच्छुक असलेल्या आर.बी. ग्रुपसोबत उद्योगमंत्रालयाने प्राथमिक बोलणी केली होती. मात्र, या कंपनीने औरंगाबादेत पाण्याच्या शाश्वतीबाबत प्रश्न निर्माण केला होता. त्यामुळे आर.बी. ग्रुपची गुंतवणूक लांबणीवर पडण्याची शक्यता होती.

मात्र, या कंपनीच्या शंकांचे निरसन झाले असून ते गुंतवणुकीसाठी तयार असल्याची माहिती औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशीप लिमिटेडचे (एआयटीएल) सहव्यवस्थापक संजय काटकर यांनी मंगळवारी (ता.२१) ‘सकाळ’ला दिली. 

पाचशे कोटींची गुंतवणुक

ऑरिक सिटी शेंद्रा ते बिडकीनदरम्यान जागेवर आरबी ग्रुप ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासाठी प्रथमिक बोलणी झाली होती. मात्र पाण्याच्या प्रश्‍नावरून पुढील प्रक्रिया लांबणीवर पडली होती. यासाठी एआयटीएल व राज्य सरकारने सातत्याने पाठपुरावा केला. यासह त्यांच्या शंकेचेही निरासन करण्यात आले आहे. 

श्री. काटकर म्हणाले, की आर.बी. ग्रुपसमोर एआयटीएल आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी मागील २० वर्षांचा पाण्यावर झालेला अभ्यास सादर केला. ऑरिक आणि औरंगाबाद एमआयडीसीसाठी उपलब्ध पाणी याची आकडेवारी ठेवण्यात आली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

ऑरिकसाठी जायकवाडीतून स्वतंत्र

ऑरिक सिटीत येणाऱ्या नवीन गंंतवणुकीसाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.  यानुसार जायकवाडी धरणातून शेंद्रा, ऑरिकसाठी स्वतंत्र पाणी पाइपलाइन टाकली आहे. यातून या वसाहतीसाठी जायकवाडी धरणामध्ये आरक्षणही ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे समाधान झाले असून लवकरच आर. बी. ग्रुप प्रत्यक्ष कामाला सुरवात करेल. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com