सिल्लोडमध्ये कोरोना कंप: आधी आई, आता मुलगाही पॉझिटिव्ह

सचिन चोबे
Sunday, 24 May 2020

औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात (घाटी) उपचार घेत असलेल्या पासष्ट वर्षीय महिलेच्या १४ वर्षीय मुलाचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमित सरदेसाई यांनी दिली. हा मुलगा सिल्लोड येथे रहात होता.  

सिल्लोड : औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात (घाटी) उपचार घेत असलेल्या पासष्ट वर्षीय महिलेच्या १४ वर्षीय मुलाचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमित सरदेसाई यांनी दिली. हा मुलगा सिल्लोड येथे रहात होता.  

हेही वाचा- शिवसेनेच्या नाकीनऊ आणलेल्या या माजी आमदाराने राजीनामा कुठं दिला?

पासष्ट वर्षीय महिला कोरोनाबधित झाल्याचा अहवाल गुरुवार (ता.२१) रोजी स्थानिक प्रशासनास प्राप्त झाला होता. सिल्लोड शहरातील अब्दालशा नगर झोपडपट्टीत रहात असलेल्या महिलेच्या घराचा परिसर प्रशासनाने सील केला होता. तिच्या सोबत औरंगाबाद येथे असलेला तीचा मुलगा सिल्लोड येथे येऊन गेल्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत तेथील परिसर निर्जंतुकीकरण करून सील करित त्या मुलाच्या संपर्कात आलेल्या सिल्लोड येथिल सोळा जणांचे स्वेब नमुने शनिवारी घेतले होते.

यातील चौदा वर्षीय मुलाचा अहवाल आज प्राप्त झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घरातील सर्व जण होम क्वारंटाईन करण्यात आले होते. सकाळी नगर परिषद प्रशासनाने या परिसरात धाव घेतली असून, नगर परिषदेने निर्माण केलेल्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये या मुलास ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

हे वाचंलत का? - आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग

घाटीतून आजवर ४७ जण कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) शनिवारी (ता. २३) सात कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये चार पुरूष आणि तीन महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये बारी कॉलनीतील ७० वर्षीय पुरूष, सिटी चौकातील ६५ वर्षीय पुरूष, रोशन गेट येथील ४२ वर्षीय पुरूष, पंचकुवा येथील ३५ वर्षीय महिला, जुना मोंढा येथील २५ वर्षीय महिला, सिल्लेखाना येथील २१ वर्षीय महिला आणि फुलशिवरा ७६ वर्षीय पुरूष रुग्णांचा समावेश आहे. यामुळे घाटीतून आतापर्यंत ४७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.

सध्या घाटी रुग्णालयात ७८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ६९ जणांची प्रकृती सामान्य असून नऊ जणांची गंभीर आहे. तसेच घाटीत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील बायजीपुरा येथील ६१ वर्षीय पुरूष रुग्णाचा २२ मे रोजी सकाळी ११.४० वाजता, किराडपुऱ्यातील ७५ वर्षीय पुरूष रुग्णाचा २२ मे रोजी संध्याकाळी ११.४० वाजता आणि सिटी चौकातील ७२ वर्षीय पुरूष रुग्णाचा आज पहाटे पाच वाजता मृत्यू झाला आहे. घाटीमध्ये आजपर्यंत ४३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

क्लिक करा- घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Second CoronaVirus Patient Found Sillod Aurangbad News