फिरत्या सूक्ष्मदर्शकेतून सागरी सूक्ष्मजीवांचे दर्शन, पंचावन्न वर्षीय मारुती गरडांचा अनोखा प्रयोग

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : समुद्रातील पाण्यात सस्तन प्राणी, मासे, कासवे आदी जलचर जीव तुम्ही पाहिले असतील. परंतु, कधी समुद्रातील अंत्यत सुक्ष्मजीवजंतू पाहिलेत का? नसतील पाहिले तर केवळ सातवी पास ५५ वर्षीय मारुती गरड यांनी दुचाकीवर फिरते सूक्ष्मदर्शक दुर्बिणीच्या माध्यमातून मृत मासे, शिल्पे तसेच समुद्रातील सूक्ष्मजीवांचे बघण्याची सोय केली आहे.


डोळ्यांना प्रत्यक्ष न दिसणारी सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये अभ्यास करण्यासाठी सूक्ष्मदर्शक या उपकरणाचा वापर करण्यात येतो. या सुक्ष्मदर्शकाचा वापर करून गावोगावी दुचाकीवरून समुद्री सूक्ष्मजीव दाखवण्याचा प्रयोग मारुती गरड यांनी केला आहे. अवघे सातवीपर्यंत शिक्षण घेणारे गरड यांना लहानपणापासून सागरी जीव बघण्याची छंद. या छंदातून गरड यांनी रत्नागिरी व गोवा येथील समुद्राच्या रेतीमधून विविध सूक्ष्मजीवांचे अवशेष जमा केले. हे मिळविल्यानंतर बाजारातून सूक्ष्मदर्शक घेत एका दुचाकीवर सूक्ष्मजीवांचे अवशेष व सूक्ष्मदर्शक दुर्बीण ठेवण्याची व्यवस्था केली. ही दुचाकी घेत गावोगावी फिरत गरड हे अवघ्या पाच रुपयांत समुद्री सूक्ष्मजीवांचे दर्शन घडवत आहेत.


गत पाच वर्षांपासून समुद्राच्या रेतीतून गोगलगायी, शिंपले शोधण्यचे कार्य केले. हे बघण्यासाठी दुर्बीण हव्या असल्याने त्या बनवल्या. यासाठी जवळपास एक लाख रुपये खर्च आला आहे. आता गावोगावी फिरून एका दिवसाला एक हजार रुपये मिळत आहे. या सुक्ष्मदर्शीत कासव, शार्क मासा, पाणकोंबडी, शिंपले, पिराना मासा, गोगलगायी तसेच समुद्राच्या आतील तळाशी येणारे राजा- राणी हे फूल ठेवले आहे.

- मारुती गरड

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com