शेअर मार्केट : कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी असं सुरू आहे प्लॅनिंग, वाचा -

प्रकाश बनकर
Tuesday, 7 April 2020

ज्यांच्याकडे पैसा आहे ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. यात प्रामुख्याने एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी या नामांकित बँकांचे शेअर खरेदी करून ठेवत आहेत. सर्वसामान्यांचा ओढा हा आपल्याकडे असलेली बचत एफडीमध्ये ठेवत आहेत. यातून मिळणाऱ्या व्याजावर कुटुंबांचा खर्च भागवण्यासाठीची प्लॅनिंग सुरू आहे.

औरंगाबाद  : कोरोनामुळे जगाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. भारतातही शेअर बाजारात निर्देशांक घसरत चालला आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी आहे. यात अनेक जण नामांकित बँका व कंपन्यांचे शेअर खरेदी करत आहेत, तर सर्वसामान्यांचा ओढा सेव्हिंग अकाऊंटकडे आहे, अशी माहिती शेअर मार्केटचे अभ्यासक अरुण पचेशिया यांनी दिली. 

एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरवात होते. यात अनेक जण स्मार्ट बचत करतात. दरवर्षी शेअर मार्केट म्युच्युअल फंड यासह रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यात येते; मात्र यंदाच्या आर्थिक वर्षावर कोरोनाचे संकट आले आहे. यामुळे गुंतवणुकीवरही मोठा परिणाम दिसून येत आहे. सध्या देशात लॉकडाऊन असल्यामुळे सर्व देश ठप्प झाला आहे. यात गुंतवणूक करणे जोखमीचे ठरणार असल्याने अनेक जण आपल्याकडे असलेला पैसा हा बँकेच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये तसेच एफडीमध्ये ठेवत आहेत. 

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

ज्यांच्याकडे पैसा आहे ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. यात प्रामुख्याने एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी या नामांकित बँकांचे शेअर खरेदी करून ठेवत आहेत. सर्वसामान्यांचा ओढा हा आपल्याकडे असलेली बचत एफडीमध्ये ठेवत आहेत. यातून मिळणाऱ्या व्याजावर कुटुंबांचा खर्च भागवण्यासाठीची प्लॅनिंग सुरू आहे.

मार्केटची स्थिती गंभीर आहे. यातून मार्केट उभारणीसाठी अजून एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने फार्मा कंपनी, आयटी कंपन्यांची स्थिती चांगली आहे. त्या तत्काळ पुढे येतील; मात्र ऑटोमोबाईल क्षेत्र, रिअल इस्टेट, इलेक्ट्रॉनिक क्षेत्र पूर्वपदावर येण्यासाठी अजून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. यामुळे जी काही गुंतवणूक होईल, गुंतवणूक नामांकित बँका व आयटी तसेच फार्म सेक्टरमध्ये होणार आहे. 
- अरुण पचेशिया, अभ्यासक, शेअर मार्केट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share Market Banks Shares In Coronavirus Business News