उत्तर द्या, उत्तर द्या, योगी सरकार उत्तर द्या! औरंगाबादेत शिवसेना संतप्त !  

प्रकाश बनकर
Saturday, 3 October 2020

औरंगाबादेतही शिवसेना युवती सेना व महिला मोर्चातर्फे शनिवारी (ता.३) क्रांती चौकात जोरदार निदर्शने करीत उत्तर प्रदेश सरकार आणि योगी सरकारचा निषेध करण्यात आला.

औरंगाबाद : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेचा पडसाद देशभरात उमटत आहे. औरंगाबादेतही शिवसेना युवती सेना व महिला मोर्चातर्फे शनिवारी (ता.३) क्रांती चौकात जोरदार निदर्शने करीत उत्तर प्रदेश सरकार आणि योगी सरकारचा निषेध करण्यात आला. यात "योगी सरकार उत्तर द्या',"युपी.सरकार हाय हाय' अशा घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला.  

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार आंबादास दानवे, आमदार संजय सिरसाट, आमदार प्रदिप जैस्वाल, बाळासाहेब थोरात सुनिता आऊलवार, कला ओझा, युवती सेनेच्या जिल्हाधिकारी डॉ.अश्‍विनी जैस्वाल, किरण शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे तरुणीवर बलात्कार करण्यात आला. पोलिसानी कुटुंबियांच्या माघारी परस्पर  तिच्यावर अंत्यसंस्कार केले. अशा प्रकारे महिलांवर अत्याचार होत राहणार का? कधी पर्यंत असेच चालणार याचे उत्तर योगी सरकारने द्यावेत. उत्तर प्रदेशात अशा घटना जास्त होत आहेत. असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी. या विषयी कडक उपाय योजना कराव्यात. जे गुन्हेगार आहेत. त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे डोळ्याला मास्क लावलेले फोटो व निषेधाचे फोस्टर आंदोलनात महिलांनी झळकविले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 
योगी सरकार बरखास्त करा : चंद्रकांत खैरे 
उत्तर प्रदेशात त्या बलात्कार घटनेच्या प्रकरामुळे त्या राज्यात योगीराज किती वाईट प्रकारे सुरु आहे, हे लोकांना कळत आहेत. महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांवर बोट दाखविणारे लोकांची परिस्थिती उघडी पडली आहे. या सरकारवर कारवाई करत हे सरकार बरखास्त करावे, अशी मागणी माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यावेळी केली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खैरै म्हणाले की, उत्तर प्रदेशात दलितांवर अत्याचार सुरु आहे. तरी देखील सरकार गप का बसले आहे. राहूल गांधी त्या ठिकाणी जात असताना पोलिसांच्या धक्का-बुक्कीत पडले, यांची चित्रफीत सगळीकडे फिरत आहे. असे असताना राज्यातील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर म्हणताय पडले की पाडले. असा प्रश्‍न उपस्थित करुन भाजप राजकारण करु लागले आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena movement against UP government Aurangabad news