esakal | अतिवृष्टीची वक्रदृष्टी : मराठवाड्यात जवळपास सहाशे जनावरांचा बळी 
sakal

बोलून बातमी शोधा

00E sakal janavrfe.jpg

शेतीबरोबरच दुग्धोत्पादनाच्या पूरक व्यवसायाचेही नुकसान 

अतिवृष्टीची वक्रदृष्टी : मराठवाड्यात जवळपास सहाशे जनावरांचा बळी 

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : यावर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीने मराठवाडा विभागात तब्बल ५९३ पशुधनाचे बळी घेतले. यामध्ये साडेतीनशेवर दुभती जनावरे होती. दुभती जनावरे मरण पावल्यांमुळे पशुपालकांचे शेतीबरोबरच दुग्धोत्पादनाच्या पूरक व्यवसायाचेही मोठे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
पावसाळा संपला असला तरी अद्याप परतीचा पाऊस सुरूच आहे. या महिन्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचनामे पूर्ण झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले, तथापि पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून जूनपासून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीने केलेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार, विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये १९ लाख ९१ हजार ४३२ हेक्टर जिरायती क्षेत्राचे नुकसान झाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तथापि, अजून परतीचा पाऊस पूर्णपणे थांबलेला नसल्याने नुकसानीच्या आकड्यांमध्ये बदल होऊ शकतो. शेतीतील काढणी करून ठेवलेल्या तसेच उभ्या पिकांचे पावसाने नुकसान केले आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे जीवितहानीही बरीच झाली आहे. जूनपासून १५ ऑक्टोबरच्या दरम्यान ५९३ पशुधनाचे बळी गेले आहेत. ३१२ मोठी दुभती जनावरे तर ८२ दुभती लहान जनावरांचा यामध्ये समावेश आहे. उर्वरित कामांसाठीची १९९ जनावरे या अतिवृष्टीत मृत्युमुखी पडली आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


बळी गेलेले जिल्हानिहाय पशुधन 

  • देड - १३७ 
  • जालना - ११४ 
  • औरंगाबाद - ८७ 
  • उस्मानाबाद - ८४ 
  • हिंगोली - ४२ 
  • परभणी - ३९ 
  • लातूर - ३४ 
  • बीड - २२ 

(संपादन-प्रताप अवचार)