कोरोनामुळे एसपीआयची लेखी परीक्षा लांबणीवर

file photo
file photo

औरंगाबाद : सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या (एसपीआय) ६० जागांसाठी मार्च महिन्यात होणारी परीक्षा काही तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकल्यात आली होती; मात्र आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता ही प्रवेशासाठीची लेखी परीक्षा आणखी लांबणीवर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, एसपीआयने राज्य सरकारकडे नवीन तारखेची मागणी केली आहे.

 या परीक्षेसाठी राज्यभरातून १३ हजार ८२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या संस्थेची लेखी परीक्षा यंदा राज्यातील चार वेगवेगळ्या सेंटरवर होणार आहे. १९७७ पासून सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे. या संस्थेतर्फे आतापर्यंत ५१९ विद्यार्थी हे संरक्षण दलात अधिकारी म्हणून विविध पदांवर कार्यरत आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

राज्य सरकारद्वारे संचालित असलेली एकमेव संस्था म्हणून नावलौकिक आहे. संरक्षण दलात येणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहेत. गेल्यावर्षी नऊ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. ती संख्या यंदा चार हजारने वाढली असून, एकूण अर्जाची संख्या १३ हजार ८२ वर पोचली आहे. एका जागेसाठी २१८ विद्यार्थ्यांचे अर्ज राहणार आहेत. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

औरंगाबाद विभागात सहा हजाराहून अधिक अर्ज 
औरंगाबाद विभागात जवळपास सहा-साडेसहा हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत. लेखी परीक्षा संपल्यानंतर पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुणे व औरंगाबाद येथे मुलाखती घेण्यात येणार आहेत. दरवर्षी लेखी परीक्षेसाठी दोन विषयांकरिता दोन वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका देण्यात येतात. यंदा मात्र एकच प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. लेखी परीक्षेची वेळ ही साडेतीन तासांची असणार आहेत
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com