esakal | सुदैवाने अपघात टळला पण प्रवाशांचा थरकाप; पैठणमध्ये लोखंडी गजात अडकली एसटी!
sakal

बोलून बातमी शोधा

paithan buss.jpg

पाटोदा-औरंगाबाद एसटीची घटना. अचानक बस गजात अडकली अन् बसमधील प्रवाशांचा थरकार उडाला. सुदैवाने मोठा अपघात टऴला.  

सुदैवाने अपघात टळला पण प्रवाशांचा थरकाप; पैठणमध्ये लोखंडी गजात अडकली एसटी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पैठण (औरंगाबाद) : एस. टी. महामंडळाची पाटोदा- औरंगाबाद ही बस पैठण शहरात प्रवेश करतांना गोलाकार महावीर चौकातील बांधकाम सुरु असलेल्या नाल्यात अडकल्याने ही बस पलटी होता होता वाचली. मात्र अचानक झालेल्या या घटनेने बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या काळजाचा थरकाप उडाला. ही घटना रात्री सात वाजेच्या सुमारास रविवारी (ता. 22) घडली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या चौपदरीकरण रस्त्याच्या कामा बाबत होत असलेल्या दुर्लक्षामुळे हा प्रसंग उद्भवला आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाटोदा आगाराची एम एच 14 बीटी 1475 या क्रमांकाची बस पाटोदा येथुन पैठण मार्गे औरंगाबादकडे चालली होती. रात्री सात वाजेच्या दरम्यान ही बस पैठण येथील बसस्थानकात प्रवाशी घेण्यासाठी व सोडण्यासाठी महावीर चौकातील वळण असलेल्या रस्त्यावरुन येत असतांना नालीच्या बांधकामाच्या लोखंडी गजात बसचे मागील डाव्या बाजुचे चाक त्यात अडकले. त्यामुळे बस पलटी होण्याचा धोका झाला होता. परंतु समोर मुरमाचे ढिगार असल्यामुळे या ढिगारावर बस टेकल्यामुळे अपघाताचा अनर्थ टळला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आगारातील वाहतुक नियंत्रक राजेंद्र कोलते, प्रत्यक्षदर्शी व्यापारी पवन लोहिया यांनी घटनास्थळी जाऊन बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बस मध्ये सुखरुप बसवुन पैठण येथे बसस्थानकात पाठवले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महावीर चौकातील रस्त्याचे काम रखडल्याने वाहतुकीची कोंडी! 
दरम्यान, हॉटेल सह्याद्री ते पाटेगाव पुला पर्यंतचे 50 लाख रुपयाचे काम अनेक वर्षांपासून सुरु आहे. सदरील काम हे पैठण येथील सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत सुरु असुन या कामात कंत्राटदाराकडून होत असलेल्या हलगर्जीपणामुळे हे काम रखडले आहे. परिणामी वाहनांची मोठी वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असुन अपघात ही होत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे. अशी मागणी वाहनधाराकांतुन केली जात आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)