CORONAVIRUS : लॉकडाऊन काळात दोन टक्के मृत्यूदर कमी : जिल्हाधिकारी चौधरी 

प्रकाश बनकर
Saturday, 18 July 2020

कोरोनामूळे जिल्‍ह्याचा मृत्युदर हा १६ जूनला ५.६१ टक्क्यांवर पोहचला होता. जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाय-योजनामुळे आज हा मुत्युदर हा ३.८० टक्क्यांवर आला आहे. जवळपास दोन टक्के मुत्युदर कमी करण्यात जिल्हा प्रशासनास यश आले असल्याची माहीती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शनिवारी (ता.१८) दिली.

औरंगाबाद : कोरोनामूळे जिल्‍ह्याचा मृत्युदर हा १६ जूनला ५.६१ टक्क्यांवर पोहचला होता. जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाय-योजनामुळे आज हा मुत्युदर हा ३.८० टक्क्यांवर आला आहे. जवळपास दोन टक्के मुत्युदर कमी करण्यात जिल्हा प्रशासनास यश आले असल्याची माहीती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शनिवारी (ता.१८) दिली.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!  
नऊ दिवसाच्या लॉकडाऊनच्या काळात जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिस प्रशासनाने काय उपाय-योजना केल्या या विषयी जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी श्री. चौधरी बोलत होते. महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका   

जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या साखळीला तोडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत. रुग्ण संख्या वाढत असताना पहिल्या ५ हजार रुग्णांमध्ये २४७ मृत्यू होते. नंतरच्या ५ हजारात १४० मृत्यू झाले. असून मृत्यू दर कमी करण्याच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. रुग्ण व्यवस्थापनामुळे वेळेत उपचार उपलब्ध होणे, उपचार सुविधामध्ये वाढ आणि गंभीर रुग्णांवर यशस्वी उपचार होत असल्याने मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. आयसीएमआरच्या सूचनांनुसार जिल्हात अँटीजेन टेस्टिंग करण्यात येत आहेत. लॉकडाऊन काळात १८ हजार ४७८ अँटीजन टेस्टिंग मध्ये ८८७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यासह याच काळात ८ हजार पीसीआर चाचण्याही करण्यात आले.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

याच लॉकडाऊन मध्ये १ हजारपेक्षा जास्त रुग्णांना शोधून काढले आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार कमी होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील रुग्ण आढळलेल्या ११८ गावांपैकी १९ गावात दहापेक्षा जास्त रुग्ण असून ७६ गावात सध्या एकही रुग्ण नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. 

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

तसेच लॉकडाऊन उघडण्याची प्रक्रिया टप्या टप्याने करावी लागेल. याबाबत व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असून सम-विषम पद्घतीने पुढील ३ दिवस लागू असणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सात हीच वेळ असणार आहे. मद्यविक्री शहरात आँनलाईन सुरू राहणार असून अजून मंदिरे उघडणार नाहीत. तसेच या संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर बकरी ईद घरीच राहून शांततेत साजरी करावी, असे आवाहन करून जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊनला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

नऊ हजार नागरिकांची तपासणी - आस्तिककुमार पांडेय 
महापालिका आयुक्त पांडेय म्हणाले, शहरातील ५० पेक्षा जास्त वय असलेल्या नऊ हजार लोकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. वक्वारंटाईन कक्ष, कोवीड केअर सेंटरची क्षमताही वाढवलेली आहे. संसर्ग रोखण्यासाठी भाजीपाला, दूध ,सलून, दुकानदारांच्या तपासण्या करण्यात येणार आहे. त्यासाठी २५ तपासणी पथक तयार केले आहेत. यासह एमएचएमएच अँप आणि पालिकेच्या वॉररुमद्वारे १४ हजार नागरिकांना आरोग्य सल्ला, उपचार देण्यात आले आहेत. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक  
शहरात एकूण ५० हजार चाचण्या केल्या असून सिटी एंट्री पॉइंटवर सहा ठिकाणांवर ७०० रुग्ण शोधण्यात आले तर मोबाईल व्हॅन फोर्सद्वारे २० हजार अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. तसेच चिकलठाणा, रेल्वे स्टेशन, एमआयडीसी भागात ही रुग्ण तपासणी करण्यात येणार असल्याचे श्री.पांडेय यांनी सांगितले. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले लॉकडाऊनचे जनतेने यशस्वी पालन केल्यामुळे शहरात कलम ३५३ नुसार एकही केस नोंद झाली नसल्याचे सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Succee in reducing mortality during lockdown Collector Uday Chaudhary