
कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबाद येथे शुक्रवारी ता.३१ विविध विकास कामांचे भूमीपूजन झाले. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचे उदघाटन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेव दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.
औरंगाबाद : पावसात भिजणाऱ्यांना हल्ली चांगले यश मिळते. असे म्हटल्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून जोरदार हास्यकल्लोळ केला. असे वक्तव्य करुन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेव दानवे यांनी नेहमीप्रमाणे उपस्थितांचे मने जिंकली. तर राजकीय सूचक करीत ते पुढे म्हणाले की, आता नाही पण कदाचित पुढचे संकेत असे असू शकतात. म्हणून पाऊस जरी पडला तरी मी भाषणाला उभा राहिलो.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबाद येथे शुक्रवारी ता.३१ विविध विकास कामांचे भूमीपूजन झाले. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचे उदघाटन त्यांनी केले.
Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम
त्यानंतर ते उपस्थितांना संबोधन करण्यासाठी मंचावर उपस्थित राहिले. तोच या प्रसंगी अतिशय जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी ते सुरुवातीलाच म्हणाले की, येऊ द्या पावसाला. पावसात भिजणाऱ्यांना हल्ली चांगले यश मिळते. असे म्हटल्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून जोरदार हास्यकल्लोळ केला. ते पुढे म्हणाले की आता नाही पण कदाचित पुढचे संकेत असे असू शकतात. म्हणून पाऊस जरी पडला तरी मी भाषणाला उभा राहिलो. दानवे म्हणाले की, अशा प्रकारचे पुतळे जेथे असतात. तेथे आपणाला प्रेरणा मिळते. महाराष्ट्रात, राज्यात, देशात असे पुतळे उभे करण्याचे कारण म्हणजे आपल्याला प्रेरणा मिळते.
बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका
शेतकऱ्यांना मिळेल प्रेरणा
औरंगाबाद मधील ही बाजारपेठ असून येथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला छत्रपतींचे दर्शन घेतल्यावर प्रेरणा मिळेल. असे ही दानवे यांनी सांगितले.
ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...
संसदेतील काढली आठवण
संसदेमध्ये विविध महापुरूशांचे पुतळे होते. मात्र शिवरायांचा पुतळा नव्हता. त्यावेळी आम्ही सर्व खासदारांनी एकत्र येऊन छत्रपतींचा पुतळा उभा रहावा यासाठी पुढाकार घेतला.
कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक
मका खरेदी साठी मागणी करावी
राज्य सरकारने केंद्राकडे मका खरेदी साठी आणखी मागणी करायला हवी केंद्र सरकार पैसे द्यायला तयार आहेत फक्त राज्य सरकारला खरेदीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका
राज्य सरकारचे स्टेरिंग कधी एकाच्या तर कधी दुसऱ्याच्या हातात
राज्य सरकारचे स्टेरिंग कधी एकाच्या हातात तर कधी दुसऱ्याच्या हातात असते हे स्टेरिंग एकाच व्यक्तीच्या हातात असायला पाहिजे, नाहीतर मोठा अपघात घडल्याशिवाय राहीणार नाही. असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद सांगितले.
(संपादन-प्रताप अवचार)