प्रेम प्रकरणातून तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या 

सुषेन जाधव
Thursday, 19 November 2020

दोघांविरूध्द क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. 

औरंगाबाद : क्रांतीचौक परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरूणीने प्रेमप्रकरणातून गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत तरूणीला तिच्या प्रियकराच्या आईने वाममार्गाला लावेन अशी धमकी दिल्यामुळे तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप मयत तरूणीच्या नातेवाईकांनी केला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमिता इंगोले (रा. क्रांतीचौक परिसर) असे गळफास घेवून आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे नाव आहे. मृत तरूणीचे गेल्या दोन वर्षापासून विनोद खेत्रे नावाच्या युवकासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. या प्रेमप्रकरणाची कुणकुण विनोद खेत्रे याच्या आईला लागल्यावर तिने मृत तरूणीला शिवीगाळ करून तुला वाममार्गाला लावेल अशी धमकी दिली होती.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

याप्रकरणी नमिता इंगोले हिच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून विनोद खेत्रे व त्याची आई अनिता खेत्रे यांच्याविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात नमिता इंगोले हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन सोनटक्के करीत आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide by hanging young woman aurangabad news