कुष्ठरोग निर्मूलनासाठी औरंगाबादेत ४१ वसाहतींत होणार सर्व्हेक्षण 

माधव इतबारे
Sunday, 29 November 2020

नारेगाव, मिसारवाडी, कैलासनगर, चिकलठाणा, जयभवानीनगर, मुकूंदवाडी, हर्षनगर, जवाहर कॉलनी, राजनगर, पीरबाजार, भीमनगर, सातारा, देवळाई, विजयनगर, बायजीपुरा, एन-८ सिडको, एन-११, गांधीनगर, शहाबाजार, शिवाजीनगर, नक्षत्रवाडी, भवानीनगर, बन्सीलालनगर, आरेफ कॉलनी, गरम पाणी, जिन्सी, मसनदपुर, पुंडलीकनगर, छावणी, सादातनगर, भावसिंगपुरा, नेहरूनगर, कैसर कॉलनी, जुनाबाजार, क्रांतीचौक, सिल्कमिल कॉलनी, हर्सूल, चेननानगर, अंबिकानगर या भागात सर्वेक्षण केले जाणार आहे. 

औरंगाबाद : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे दाट लोकसंख्या असलेल्या ४१ वसाहतींत सर्वेक्षण केले जाणार आहे. 
सर्वेक्षणासाठी १५७ पथके तयार केली आहेत. ४६ सुपरव्हायझरच्या नियंत्रणाखाली ही पथके काम करतील. ५४ हजार ९३० घरांचे सर्वेक्षण केले जाईल. दोन लाख ७४ हजार ६५१ नागरिकांची तपासणी केली जाईल.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

नारेगाव, मिसारवाडी, कैलासनगर, चिकलठाणा, जयभवानीनगर, मुकूंदवाडी, हर्षनगर, जवाहर कॉलनी, राजनगर, पीरबाजार, भीमनगर, सातारा, देवळाई, विजयनगर, बायजीपुरा, एन-८ सिडको, एन-११, गांधीनगर, शहाबाजार, शिवाजीनगर, नक्षत्रवाडी, भवानीनगर, बन्सीलालनगर, आरेफ कॉलनी, गरम पाणी, जिन्सी, मसनदपुर, पुंडलीकनगर, छावणी, सादातनगर, भावसिंगपुरा, नेहरूनगर, कैसर कॉलनी, जुनाबाजार, क्रांतीचौक, सिल्कमिल कॉलनी, हर्सूल, चेननानगर, अंबिकानगर या भागात सर्वेक्षण केले जाणार आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कुष्ठरोग निर्मूलनासाठी सर्वेक्षण 

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एक ते १६ डिसेंबर दरम्यान कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबवून कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. समन्वय समितीच्या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. शेळके, सहायक संचालक डॉ. ए. बी.धानोरकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. अविनाश बोरकर उपस्थित होते.  

(संपादन-प्रताप अवचार)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: survey will be conducted 41 colonies Aurangabad for eradication leprosy