esakal | कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात दहा शाळा बंद, अनेक शिक्षक बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Latest News

शहरात कोरोनाचे वाढते संकट पाहता पाचवी ते नववी व अकरावीचे वर्गातील विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र असल्याशिवाय प्रवेश देण्यात येवू नयेत, असे आदेश यापूर्वीच मनपा आयुक्तांनी दिले.

कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात दहा शाळा बंद, अनेक शिक्षक बाधित

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत दहा शाळांमध्ये कोरोनाबाधित शिक्षक आढळून आले आहेत. त्या शाळा तातडीने बंद करण्यात याव्यात, असे आदेश शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी दिले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर जिल्ह्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरु केल्या होत्या. शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर कोरोना चाचणी करणे सक्तीचे करण्यात आले होते.

वाचा - रागाच्या भरात घरातून गेलेला तरुण ज्या अवस्थेत सापडला त्याने सर्वांनाच बसला धक्का, सर्वत्रच व्यक्त होतेय हळहळ

दरम्यान, २३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील, तर चार जानेवारीपासून शहरातील नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. त्यानंतर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग देखील सुरु करण्यात आले होते. पाचवी ते बारावीपर्यंत शाळा सुरु झाल्याने पहिली ते चौथीच्या मुलांना देखील शाळा सुरु होण्याची प्रतिक्षा लागली होती. मात्र, पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

वाचा - रात्री फिरणे दूरच, रस्त्यावर थांबताही येणार नाही! औरंगाबादेत आठ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी

शहरात कोरोनाचे वाढते संकट पाहता पाचवी ते नववी व अकरावीचे वर्गातील विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र असल्याशिवाय प्रवेश देण्यात येवू नयेत, असे आदेश यापूर्वीच मनपा आयुक्तांनी दिले. मात्र, जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढता दिसत असल्याने २८ तारखेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा


मागील आठ दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री, पैठण, गंगापूर तालुक्यातील दहा ते बारा शाळांमध्ये कोरोनाबाधित शिक्षक आढळून आले आहेत. या शाळा दहा दिवस बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी दिले आहेत.

संपादन - गणेश पिटेकर