‘सचखंड’मधील २७५ प्रवाशांची चाचणी! 

प्रकाश बनकर
Sunday, 22 November 2020

२६७ जणांच्या अॅटीजेन चाचणीत एकजण कोरोना पॉझिटिव्ह 

औरंगाबाद : दिल्लीहून रविवारी (ता. २२) आलेल्या सचखंड एक्स्प्रेसमधील २७५ प्रवाशांपैकी २६७ प्रवाशांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात एकजण कोरोना बाधित आढळला. आठ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोना संसर्गाने दिल्ली शहरात पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. सचखंड एक्स्प्रेस ही रेल्वे दिल्लीहून औरंगाबाद मार्गे नांदेडला जाते. त्यामुळे या रेल्वेतून शहरात येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित करण्याचे महापालिका प्रशासनाने ठरविले आहे. रोज सरासरी दोनशे ते अडीचशे प्रवासी या रेल्वेतून औरंगाबाद रेल्वे स्थानकावर उतरतात. या सर्व प्रवाशांची अ‍ॅंटीजेन व आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी रविवार पासून (ता.२२) करण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सचखंड एक्स्प्रेसच्या वेळेत महापालिकेचे डॉ. शुभांगी मुंढे, डॉ. पूजा कनके व त्यांना सहकार्य करण्यासाठी अक्षय शेळके, कुणाल सुरडकर ही दोन पथके नियुक्ती करण्यात आले. या रेल्वेतून २७५ प्रवासी उतरताच त्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी त्यांना रेल्वेस्टेशनवर थांबविण्यात आले. यातील २६७ जणांची अ‍ॅंटीजेन चाचणी केली, असता एकच प्रवासी पॉझिटिव्ह निघाला. आठ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून, त्याचा अहवाल सोमवारी प्राप्त होणार असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Testing 275 passengers in Sachkhand express