तुटपुंजी कमाई संपली, घर विकण्याची वेळ, गोंधळी कलावंत उगलेंची ह्रदयद्रावक कहाणी

सुशील राऊत 
Wednesday, 28 October 2020

गोंधळी कलावंत उगले यांची अवस्था. कोरोनाने जगावे कसा पडला प्रश्न, यंदाचा सिजन ही गेला. उसनवारी देता येईना. कुटुंबाला खरी आहे मदतीची गरज.  

औरंगाबाद : आयुष्यभर परडी घेऊन केलेली तुटपुंजी कमाई या लॉकडाऊन मध्ये संपली. लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेल्याने बायकोचे दागिने गहाण ठेवले. आता पंधरा दिवसांपासून घरात गॅस संपला आणि आठ हजार रुपयांचे लाईट बिल आल्याने लाईट बंद करण्याच्या नोटीस येत आहे. आता आम्ही जगायचं कस असा सवाल विचारताय शाहीर तुकाराम उगले.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
मूळचे गानोरी येथील तुकाराम रखामजी उगले (वय 65) ह. मु. राधास्वामी कॉलनी एकता नगर औरंगाबाद. हे गेल्या चाळीस वर्षांपासून गोंधळी व्यवसाय करून आपली उपजीविका भागवतात. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून देशात लॉक डाऊन करण्यात आले. आणि या कलाकारांच्या तुणतुणं, संबळीचा आवाज थांबला. यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गोंधळी हा आमचा पारंपरिक व्यवसाय असल्याने बालवयातच या कलेची ओळख झाली. परंतु शिक्षण सुरू असल्यामुळे वयाच्या पंधराव्या वर्षी या कलेशी खरी नाळ जोडली गेली. घराची जबाबदारी वाढल्याने 1976 ला शिक्षण सोडलं आणि हा व्यवसाय करायला सुरुवात केली. गेल्या 40 वर्षापासून लोक मनोरंजनातून समाज प्रबोधन करत आलो आहे. आज पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम झाले. असून अनेक ठिकाणी पुरस्कार मिळाले. तुकाराम उगले यांच्या खंडोबाचं लग्न, देवीचा गोंधळ, जांभूळ अश्या व्याख्यानावर संशोधन झाले आहे.
 
त्यांनी लॉकडाऊन दरम्यान घरातील खर्च भागवण्यासाठी नातलग -ओळखीच्याकडून उसनवारी करून पैसे घेतले. आता या पैश्यांची मागणी त्यांच्याकडून केली जाते. त्यामुळे त्यांचे पैसे कुठेन द्यायचे आणि घर कसं चालवायचं असा अडचणीचा प्रश्न आमच्या कलाकारांवर पडला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्या घरातील गॅस संपला असल्याने पावसाने ओल्या झालेल्या लाकडांच्या धुरात त्यांना स्वयंपाक करावा लागत आहे. घरात हातभार लागावा यासाठी त्यांच्या पत्नी धूण भांडी घासायची कामे करतात. त्यामुळे राहतं घर विकून उदरनिर्वाह करावा की अशी चिंता त्यांना सतावत आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सिजन गेले, कला सोडण्याची वेळ आली 

या वर्षाच्या सुरुवातीपासुनच लग्न सराई, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, चैत्र यात्रा, उरूस पंढरपूरची वारी यासह एै सिजनाच्या वेळी काम बंद पडलं. यामुळे अनेक कलाकारांना उपासमरीची वेळ आली आहे. अनेकांना इच्छा नसतांना पोटाच्या खळगी भरण्यासाठी हा व्यवसाय सोडावा लागला. तर अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे अनेक कलाकार कला सोडून मोल मजुरीचे काम शोधात आहे.

मायबाप सरकाने सर्व कलावंत बांधवांच्या होणाऱ्या हाल अपेष्ठाचा विचार करावा. इतर व्यवसाय करण्याचा ज्या प्रमाणे नियम व अटीच्या शर्ती देऊन परवानगी दिली. त्याच प्रमाणे आम्हाला नियम व अटी सह पोट भरण्यासाठी परवानगी द्यावी. 

-तुकाराम उगले, (शाहीर)

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Time of famine Gondhali artist Tukaram Ugale Aurangabad news