esakal | सोलापूर-धुळे महामार्गावरील चाळीसगाव घाटात वाहतूक कोंडी, वाहनचालक वैतागले
sakal

बोलून बातमी शोधा

Chalisgaon Ghat

सोलापूर-धुळे महामार्गातील कन्नडजवळ चाळीसगाव घाटात वाहनधारकांना सोमवारी (ता.दोन) वाहतूक कोंडीला समोरे जावे लागले आहे.

सोलापूर-धुळे महामार्गावरील चाळीसगाव घाटात वाहतूक कोंडी, वाहनचालक वैतागले

sakal_logo
By
संजय जाधव

कन्नड (जि.औरंगाबाद)  : सोलापूर-धुळे महामार्गातील कन्नडजवळ चाळीसगाव घाटात वाहनधारकांना सोमवारी (ता.दोन) वाहतूक कोंडीला समोरे जावे लागले आहे. हा त्रास वाहन चालकांना नेहमीचाच आहे. येथील पंधरा मिनिटांच्या प्रवासाला चार-पाच तास तर कधी-कधी पहाटेपर्यंत घाटात अडकून पडावे लागत आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा महत्वाचा दुवा आहे. गेल्या काही वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, एक डिसेंबरला मतदान

कन्नड तालुक्यातील तेलवाडीपर्यंत काम प्रगतीपथावर आहे. मात्र त्यापुढे घाटासह धुळ्यापर्यंत काम सुरू झालेले नाही. दरम्यान घाटातील रस्त्यात जागोजागी खड्डे पडल्याने गेल्या महिन्यापासून घाटात वेळोवेळी वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना अडकून पडावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे या संदर्भात अनेक माध्यमातून प्रत्येक वेळी रस्ता दुरुस्तीची विनंती करण्यात आली. मात्र प्राधिकरणाने थातूर-मातूर डागडुजी केली. पण त्याचा उपयोग होत नसल्याने आता पुन्हा प्रवासी व वाहतूकदारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

नागदहुन पर्यायी मार्गही अडचणींचा
चाळीसगाव घाट बंद असल्यावर पर्यायीमार्ग गौताळा अभयारण्यातून जातो. मात्र हा मार्ग खूप अरुंद असून गौताळा घाटात यूपीन अरुंद वळणे आहेत. येथून महामार्गावरील मोठी वाहतूक होऊ शकत नाही. मात्र घाट बंद असल्यावर एसटी बसला नाईलाजाने नागदमार्गे जावे लागते.

सुटे पैसे आणण्यासाठी रस्ता ओलांडताना कारने दिली जोराची धडक, पादचाऱ्याचा मृत्यू


खासगी बस नांदगावमार्गे जातात
घाटात वाहतूक कोंडी असल्याचे कळल्यावर खासगी बस कन्नड मार्ग बदलून नांदगावमार्गे जाणे पसंद करतात. औरंगाबादहुन कन्नडमार्गे अहमदाबाद, सुरत, इंदूरसह मध्य प्रदेश व गुजरात येथे दररोज सायंकाळी व रात्री अनेक बस आहेत. मात्र घाट बंद असल्यावर कन्नड येथील प्रवाशांना सोडून खासगी बस नांदगावमार्गे जातात.


संपादन - गणेश पिटेकर