राज्यभर ट्रान्सपोर्ट श्रेणीतील वाहन परवान्याचा 'पेच'

parwana.gif
parwana.gif

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट श्रेणीतील वाहन परवान्यांची प्रलंबीत यादी प्रचंड मोठी झाली आहे. ट्रान्सपोर्ट वाहन ड्रायव्हिंग स्कूलशिवाय काढता येत नाही, आणि प्रत्येक स्कूलचा दररोजचा कोटा ठरलेला आहे. त्यामुळे सर्व संगणकीय प्रणाली असल्याने अधिक उमेदवारांना ट्रेनिंग देता येत नसल्याने, लॉकडाऊनच्या काळातील प्रलंबीत राहिलेल्या शेकडो उमेदवारांना परवाने कसे देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

आरटीओ कार्यालयातून देण्यात येणाऱ्या ट्रान्सपोर्ट, एलएमव्ही ट्रान्सपोर्ट (टीआर), एलएमव्ही थ्रिव्हिलर ट्रान्सपोर्ट (टीआर) या श्रेणीतील वाहन परवाना काढण्यासाठी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ट्रेनिंग घेणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ॲडमीशन घेतल्यानंतर दररोज एक तासाच्या ट्रेनिंग काळाची संगणकीय नोंद होते. प्रशिक्षण सुरु होण्यापूर्वी ओटीपी जनरेट होतो, हा ओटीपी टाकल्यानंतरच प्रशिक्षण सुरु होते. त्यानंतर पूर्ण एक तास झाल्यानंतर पुन्हा ओटीपी जनरेट होतो. 

त्याचीही नोंद आँनलाईन पद्धतीने होते. या प्रकारचे प्रशिक्षण एक महिना पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराची परिवहन निरिक्षकासमोर पुन्हा चाचणी घेतल्यानंतर, ट्रान्सपोर्ट श्रेणीतील वाहन परवाना दिला जातो. यासाठी प्रत्येक मोटार ड्रायव्हिंग स्कूलला कोटा ठरवून दिलेला आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरातील विविध ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतलेल्या शहरातील हजारो उमेदवारांचे प्रशिक्षण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आता नविन उमेदवारांना प्रवेश कसा द्यावा आणि जुन्या उमेदवारांना प्रशिक्षण कसे द्यावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

ट्रान्सपोर्ट श्रेणीतील प्रलंबीत परवान्यांचा हा प्रश्न राज्यभर निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रलंबीत परवान्यासाठी आँनलाईन पद्धत ऐवजी म्यॅन्यूअल पद्धतीने ग्राह्य धरावे असे पत्र परिवहन आयुक्तांनी काढले आहे. त्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या काळातील रिनिव्ह्युअल प्रलंबीत असलेल्या स्कूलचे उमेदवार आँफलाईन पद्धतीने स्वीकारावेत आणि स्कूलचे रिनिव्ह्युअलही केले पाहिजे.  
देवेंद्र पांडे अध्यक्ष, मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोशिएशन

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com