CoronaVIrus : यारो डाक्टरने बहोत जान लगाई, तह दिल से शुक्रगुजार हू

मनोज साखरे
Friday, 1 May 2020

आज मुझे बहुत खुशी हुई. यहा के सब लोगो मुझे जान लगाई. मेरा अच्छा खासा खयाल रखा. अब मै घर जा सकता हूॅं सब के साथ रहकर खाना खा सकता हू, आपका तह दिल से शुक्रिया....या भावना आहेत रुग्णालयातून सुट्टी झालेल्या किराडपूऱ्यातील २२ वर्षीय तरुणाच्या.

औरंगाबाद : आज मुझे बहुत खुशी हुई. यहा के सब लोगो मुझे जान लगाई. मेरा अच्छा खासा खयाल रखा. अब मै घर जा सकता हूॅं सब के साथ रहकर खाना खा सकता हू, आपका तह दिल से शुक्रिया....या भावना आहेत रुग्णालयातून सुट्टी झालेल्या किराडपूऱ्यातील २२ वर्षीय तरुणाच्या. या तरुणाला रुग्णालयातून आज सुट्टी देण्यात आली.

सोनिया गांधी म्हणाल्या, सर्व उद्योगांना विशेष पॅकेज द्या

किराडपूरा येथील पाच रुग्ण आढळून आल्यानंतर हा भाग हॉटस्पॉट ठरला होता यातील चौघांना रुग्णालयातून सुटी मिळाली पण २२ वर्षीय तरुणाचा बारा दिवसानंतरचा लाळेचा नमुना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे ४८ तासानंतर त्याच्या लाळेच्या नमुन्याची परत चाचणी करण्यात आली.

दुसरा आणि तिसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्याला आज सुटी देण्यात आली. त्याला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी डिस्चार्ज कार्ड दिले. यावेळी डॉ. पद्मा बकाल, डॉ पद्मजा सराफ, डॉ कमलाकर मुदखेडकर उपस्थिती होते. दवाखान्यातून घरी जाताना त्याने सर्वांचे धन्यवाद मानले.

मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा

आतापर्यंतचे कोरोनामुक्त (कंसात सुटीची तारीख)
२३ मार्च  : १
१५ एप्रिल : १
१८ एप्रिल : १
१९ एप्रिल : ५
२० एप्रिल : ७
२२ एप्रिल : १
२४ एप्रिल : ६
२९ एप्रिल : १
१ मे       :  १
एकूण      : २४

ज्येष्ठांना मिळणार घरातच वैद्यकीय सल्ला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty For Patient Negative Aurangabad News