
शहराला सर्वच बाजंनी कोरोनाचा विळखा बसत आहे. शनिवारी (ता.२३) सकाळी २३ रुग्णांची वाढ झाली असून आकडा हा १२४१ वर पोहोचला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.
औरंगाबाद : शहराला सर्वच बाजंनी कोरोनाचा विळखा बसत आहे. शनिवारी (ता.२३) सकाळी २३ रुग्णांची वाढ झाली असून आकडा हा १२४१ वर पोहोचला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. कोरोनाच्या आकडेवाढीने शहराची चिंता वाढत चालली आहे. शुक्रवारी (ता.२२) औरंगाबादेत दिवसभरात ३२ रुग्ण वाढले होते, तर चार जणांचा बळी गेला. प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करूनही कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आलेला नाही.
औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
या भागात वाढले रुग्ण
सादाफनगर-१, रेहमानिया कॉलनी -१, महेमूदपुरा-१, औरंगपुरा-१, सिडको एन-आठ-१, सिडको एन-चार, गणेश नगर -१, ठाकरे नगर, एन-दोन-२, न्याय नगर -३, बायजीपुरा -१, पुंडलिक नगर -२, बजरंग चौक, एन-सात-३, एमजीएम परिसर -१, एन-पाच सिडको-१, एन-बारा, हडको-१, पहाडसिंगपुरा-१ भवानी नगर-१ आणि गंगापूर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी -१ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ६ महिला आणि १७ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
असा आहे कोरोना मीटर
उपचार - ६२५
बरे झालेले - ५७०
मृत्यू -४६
एकूण रुग्ण - १,२४१
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
आजवर ४६ जणांचा मृत्यू
महापालिका कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या खासगी रुग्णालयात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू १८ मे रोजी झाला. त्याची माहिती आज प्राप्त झाली. त्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयांत आतापर्यंत चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरात एकूण ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
बायजीपुरा येथील ६१ वर्षीय रुग्णाला दम लागत असल्याने १६ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घाटीच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लक्षणावरून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाणही ८४ टक्के होते. प्रकृती खालावल्याने त्यांना १७ मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अतिदक्षता विभागात भरती केले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते; मात्र शर्तीचे उपचार करूनही त्यांचा २२ मे रोजी मृत्यू झाला. त्यांना उच्चरक्तदाब व मधुमेह हा आजार होता.
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा