तुमचे मोबाईल शॉप आहे, मग हेच वाचाच, औरंगाबादेत आलाय अनुभव

arrest
arrest

औरंगाबाद: मोबाईल शॉपी फोडून सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शोखेने गजाआड केले आहे. चोरट्यांकडून पोलिसांनी ६५ हजार रुपये किमतीचे मोबाईल जप्त केले. अनिल सोमिनाथ शिंदे (२२, रा. जिकठाण, आंबेडकर चौक, ता. गंगापूर) व सोमिनाथ दामू जाधव (२३, रा. जटवाडागाव, ता.जि. औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.

प्रकरणात मीर अस्लम बेग (रा. सादातनगर, रेल्वेस्टेशन) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, मीर बेग हे एन-पाच, कॅनॉट प्लेस, साई आर्केड येथील इनलीड इलेक्ट्रॉनिक प्रा. लि. ओपो सर्व्हिसिंग सेंटरवर काम करतात. दुकान बंदची संधी साधत चोरट्यांनी मोबाईल शॉपी फोडून दीड लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरून नेले. २१ मे रोजी मीर अस्लम बेग यांना चोरीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर बेग यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपींविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विकायला आले अन् अडकले

प्रकरणाचा तपास सुरू असताना दोन संशयित व्यक्ती आमखास मैदानाजवळ महागडे मोबाईल विक्री करण्यासाठी थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक अजिबसिंग जारवाल व त्यांच्या पथकाने वरील दोघा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी चोरट्याकडून ६५ हजार रुपये किमतीचे मोबाईल जप्त केले. तर उर्वरित मोबाईल पसार झालेल्या साथीदाराकडे असल्याची कबुलीदेखील चोरट्यांनी दिली. दोघा चोरट्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एन. माने यांनी मंगळवारी (ता.२६) दिले. प्रकरणात सहायक सरकारी वकील एस.आर. ढोकरट यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com