औरंगाबादेत तब्बल १०६ किलो गांजा पकडला, महिलांसह दोघे अटकेत

सुषेन जाधव
Thursday, 1 October 2020

चक्क इनोव्हा गाडीचा वापर करत तब्बल १०६ किलो गांजा विक्री करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. प्रकरणात या गुन्ह्यातील दोन पुरुषांसह दोन महिलांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक करत त्यांच्याविरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

औरंगाबादः चक्क इनोव्हा गाडीचा वापर करत तब्बल १०६ किलो गांजा विक्री करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. प्रकरणात या गुन्ह्यातील दोन पुरुषांसह दोन महिलांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक करत त्यांच्याविरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

बाप मारतो म्हणून मुलीने गाठला रेल्वे रुळ, पुढे देवासारखे धावले पाटील काका !  

महत्वाचे म्हणजे या गुन्ह्यातील एका संशयिताविरोधात या आधी गांजा विक्री केल्याचा आरोपही आहे. आर्थिक गुन्हे शाखेने ही गाडीचा पाठलाग करत ही कारवाई केली. विशाल छगन तामचीकर, (४८), शेरसिंग अमु इंदरेकर (३६ रा. बलुची गल्लो नारेगाव) अशी त्या संशयितांची नावे असून याशिवाय दोन महिला आरोपींचाही समावेश आहे.
 
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, उपनिरीक्षक विठ्ठळ यांना मयूरपार्क भागातून सुपर थर्टी शाळेकडे गांजा विक्री करणाऱ्यासाठी इनोव्हा (एमएच ०३, बीसी २७१३) ही कार जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन सहकाऱ्यांच्या मदतीने संबंधित कार जाताना पोलिसांनी थांबविली असता, ती कार थांबली नाही. मयुरपार्क रस्त्याने वेगाने जाऊन काही अतंरावर एका ठिकाणी इनोव्हा थांबली.

औरंगाबादेत रेल्वे स्टेशन परिसरात जुगार अड्ड्यावर छापा, ११ जणांना घेतले ताब्यात, २ लाखांचा ऐवज जप्त 

त्यातून दोघेजण गाडी सोडून पळाले, पोलिसांनी त्यांना काही अंतरावरुन शिताफीने पकडले. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनिल गायकवाड, उपनिरीक्षक विठ्ठल चासकर, उपनिरीक्षक अमोल देशमुख, शेख नजीर, सतीश जाधव, सुधाकर मिसाळ, ओमप्रकाश बनकर, संजयसिंह राजपूत, शिवा बोर्डे, रविंद्र खरात, अमर चौधरी, धर्मराज गायकवाड, राजकुमार सुर्यवंशी, नितीन देशमुख, नितीन धुळे, संजिवनी शिंदे यांनी केली.

तब्बल १०६ किलो गांजा जप्त 
इनोव्हाची तपासणी केली असता, पोलिसांना डिकीत ४ प्लास्टिकच्या गोण्यात गांज्याच्या ४९ बॅगा आढळून आल्या. पोलिसांनी १०६ किलो ३०० ग्रॅम बाजारभावानुसार ५ लाख ३१ लाख ५०० रुपये किंमतीचा गांजा, एक इनोव्हा कार असा एकूनण १५ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला. 

मध्य प्रदेशच्या भाचीला ६ वर्षांनी सापडली महाराष्ट्रात मामी, एका फोनवर पोलिसांनी घेतला शोध

महत्त्वाचे म्हणजे या गुन्ह्यातील संशयित तामचीकर याच्याविरोधात एम सिडको पोलिस ठाण्यात गांजा तस्करीप्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. उपनिरीक्षक चासकर यांच्या तक्रारीवरुन संशयितांविरोधात हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Arrested In The Matter Of Ganja Selling Auirangabad News