"दिशासह "त्या' बांधकाम व्यवसायिकांकडे 300 कोटींची अघोषित संपत्ती

प्रकाश बनकर
Friday, 24 January 2020

शहरातील दिशा ग्रुपसह अन्य एका बांधकाम व्यवसायिकांच्या संपत्ती संदर्भात नाशिक आणि पुणे येथील 300 अधिकाऱ्यांनी एकाच वेळी छापे टाकले. शहरासह देशातील नऊ राज्यातील 50 ठिकाणी 21 ते 23 जानेवारीरम्यान ही कार्यवाही करण्यात आली.

औरंगाबाद: करचुकवेगिरी करणाऱ्या दिशा ग्रुप व अन्य एका बांधकाम व्यवसायिकांवर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले. यात दिशासह त्या व्यवसायिकांकडे 250 ते 300 कोटींची अघोषित संपत्ती असल्याचे प्रथमिक तपासणी अहवालातून समोर आल्याची माहिती सूत्रांनी शुक्रवारी (ता. 24) दिली. 

शहरातील दिशा ग्रुपसह अन्य एका बांधकाम व्यवसायिकांच्या संपत्ती संदर्भात नाशिक आणि पुणे येथील 300 अधिकाऱ्यांनी एकाच वेळी छापे टाकले. शहरासह देशातील नऊ राज्यातील 50 ठिकाणी 21 ते 23 जानेवारीरम्यान ही कार्यवाही करण्यात आली. यात बांधकाम व्यवसायिकांचे कार्यालये, घरी, तसेच जिनिंग प्रेससह त्यांच्या भागिदारांचीही तपासणी करण्यात आली. 

हे ही वाचा ः औरंगाबादेत दोन बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तिकरचे छापे

हॉटेल, कंपन्यांवर कारवाई 
तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नांदेड, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, छत्तीसगडसह नऊ राज्यांमधील दोन्ही उद्योग समुहाशी संबंधित कार्यालये, निवासस्थाने, हॉटेल्सवर एकाचवेळी छापा मारण्यात आला होता. औरंगाबादसह महाराष्ट्रातील मुंबई, बंगळुरू, कोलकत्ता येथील काही कंपन्यांशीही संबंधित कागदपत्रे तपासणीत पुढे आले असून, त्यांच्याशी नेमका कोणता व्यवहार झाला, याची माहिती आता कागदपत्रांच्या छाणणीतून समोर येणार आहे. 

हेही वाचा - मनोरुग्णांना इथे मिळणार पूर्ण उपचार

करचुकवेगिरी भरली धडकी

यातील कागदपत्रांच्या छाणनीतून जवळपास 300 कोटींची अघोषित उत्पन्न निघत असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे प्राप्तिकर विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. करचुकवेगिरीचा काही प्रकार आहे का, याचीही माहिती पुढे येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शैक्षणिक संस्थेनंतर औरंगाबादेत प्राप्तीकर विभागाने केलेली सर्वांत मोठी कार्यवाही केली आहे. यामुळे करचुकवेगिरी करणाऱ्यांना मोठी धडकी भरली आहे. 

हे ही वाचा ः खैरे खासदार असते तर बस इलेक्‍ट्रिक असत्या! 

दीडशेहून अधिक पोलिसांचीही समावेश 
औरंगाबादेत झालेल्या कार्यवाहीत नगर, नाशिक येथून दीडशेहून अधिक पोलिसांना बोलविण्यात आले होते. यासह तीनशे अधिकाऱ्यांमध्ये औरंगाबादेतील अधिकाऱ्यांचाही समावेश होता. तीन दिवस सकळी आठपासून सुरू झालेल्या कार्यवाहीत महत्त्वपूर्ण दस्तावेज प्राप्तीकर विभागाच्या हाती लागले आहेत. त्याच दिशेने आता कार्यवाहीची प्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

वाचा - या कारणांनी खालावत आहे शुक्राणूंची गुणवत्ता

वसूल होणार कर व दंड 
प्राप्तीकरण विभागाने केलेल्या या कार्यवाहीत समोर आलेल्या 250 ते 300 कोटी रुपयांच्या रक्‍कमेची ऍसिस्टमेंट केली जाणार आहे. त्यानंतर त्या रक्‍कमेवर विभागातर्फे सुरवातीला कर सूल केला जाईल. त्यानंतर त्यांच्याकडून दंडही वसूल केला जाणार आहे. हा दंड जवळपास 60 ते 70 टक्‍क्‍यांच्या घरात राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा -'तान्हाजी'तील 'चुलत्या' नेमका आहे तरी कोण, वाचा संघर्ष...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Builders Trapped In Tax Evasion in Aurangabad