आता रोजच दोनशे पार !, औरंगाबादेत कोरोनाचा संसर्ग झपाट्यात, नागरिक कचाट्यात

CoronaVirus Image.jpeg
CoronaVirus Image.jpeg

औरंगाबाद : शहर परिसरात आता रोजच कोरोना बाधित  दोनशेच्या पार रुग्ण आढळत आहेत. औरंगाबादकरांसाठी ही चिंतेची बाब असून रविवारी (ता. २८) २७१ रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यात आज (ता. २९) २०२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे औरंगाबादकरांसह ग्रामीण भागातील नागरिकांनी अधिक सुरक्षित राहण्याची खूप गरज आहे.

जिल्ह्यात आज सकाळी आढळलेल्या  २०२ कोरोनाबाधित रुग्णांत १२३ पुरूष, ७९ महिला आहेत. आतापर्यंत एकूण ५ हजार २३९ कोरोनाबाधित आढळले असून २ हजार ५५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २४७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २ हजार ४३६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती  जिल्हा प्रशासनाने दिली.

आज शहरात आढळलेले  ११४ रुग्ण (कंसात रुग्ण संख्या)  

देवळाई सातारा परिसर (१), आंबेडकर नगर (१), भीमनगर, भावसिंगपुरा (२), जामा मस्जिद परिसर (४), हर्षल नगर (१), मुकुंदवाडी (३), संजय नगर (१), हिंदुस्तान आवास (२), न्यू बालाजी नगर (१), पुंडलिक नगर (४), सन्म‍ित्र कॉलनी (१), शिवाजी नगर (२), एन बारा (२), नागेश्वरवाडी (५), काबरा नगर, गारखेडा (१), न्याय नगर (३), एन चार सिडको (१), नवजीवन कॉलनी, हडको (१), पहाडसिंगपुरा (५), मिल कॉर्नर (१), बालाजी नगर (५), उत्तम नगर (१), भाग्य नगर (७), नारेगाव (७), 

अजब नगर (३), जय भवानी नगर (४), न्यू हनुमान नगर (१), शिवशंकर कॉलनी (४), बीड बायपास (१), विजय नगर (१), सिद्धार्थ नगर (१), नाईक नगर, बीड बायपास (१), संभाजी कॉलनी (१), अरिश कॉलनी (३), मुकुंवाडी (१), एन दोन, सिडको (६), अविष्कार कॉलनी (१), पिसादेवी (१),  विसावा नगर (१), विठ्ठल नगर (२), भिमाशंकर कॉलनी (१), राजा बाजार (२), ठाकरे नगर (१), चिकलठाणा  (३), जाधववाडी (३), कैलास नगर (३), एन अकरा, सिडको (१), उल्कानगरी (१), एन आठ, सिडको (२), एन नऊ, सिडको (१), अन्य (२)

ग्रामीण भागात आज आढळलेले ८८ रुग्ण

शाहू नगर, इसारवाडी, पैठण (१), शिवराई, वाळूज (१), कन्नड (२), वडनेर, कन्नड (१), वरुडकाझी, करमाड (६), वाळूज सिडको, बजाज नगर (१), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (१), बजाज नगर (११), कृष्णा कोयना सो., बजाज नगर (२), भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर (२), नवजीवनधारा सो., बजाज नगर (२), श्रीराम नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर (२), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (६), भवानी चौक, बजाज नगर (२), गुलमोहर कॉलनी, बजाज नगर (३), शिवालय चौक, बजाज नगर (१), संभाजी चौक, बजाज नगर (१), ‍

सिडको वाळूज महानगर, बजाज नगर (४), बजाज विहार, बजाज नगर (१), कृष्णामाई सो., बजाज नगर (३), गणेश नगर, सिडको महानगर, बजाज नगर (२), नवनाथ सो., बजाज नगर (१), देवदूत सो., बजाज नगर (१), तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (१), गोकुळधाम सो., बजाज नगर (१), वाळूज हॉस्पीटल शेजारी, बजाज नगर (१), नवनाथ सो., बजाज नगर (१), सप्तशृंगी मंदिराजवळ, बजाज नगर (२), अयोध्या नगर, बजाज नगर (१), पन्नालाल नगर, पैठण (२), बोजवरे गल्ली, गंगापूर (२), वाळूज, गंगापूर (२), भेंडाळा, गंगापूर (२), शिवाजी नगर, गंगापूर (२), दर्गावेस, वैजापूर (१२),  लासूरगाव, वैजापूर (१), सारा पार्क वैजापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.                  

कोरोना मीटर -
सुटी झालेले रुग्ण - २५५६
उपचार घेणारे रुग्ण - २४३६
एकूण मृत्यू             - २४७
आतापर्यंतचे बाधित  - ५२३९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com