
औरंगाबाद : शहरातील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्राच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ मधील सुविधांचे उद्घाटन गुरुवारी (ता.२४) केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पत्रकात परिषदेत खासदार डॉ.भागवत कराड आणि केंद्राचे संचालक वीरेंद्र भांडारकर यांनी दिली.
औरंगाबाद : शहरातील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्राच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ मधील सुविधांचे उद्घाटन गुरुवारी (ता.२४) केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पत्रकात परिषदेत खासदार डॉ.भागवत कराड आणि केंद्राचे संचालक वीरेंद्र भांडारकर यांनी दिली. या प्रसंगी ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण तलाव आणि हॉकीच्या टर्फ मैदानाचे उद्घाटन करणार आहेत.
तलवारबाजी या क्रीडा प्रकारासाठी आवश्यक अशा सुसज्ज हॉल आणि अन्य सुविधांसह उभारण्यात येणाऱ्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण किरण रिजिजू यांच्या हस्ते केले जाणार आहे. गुरुवारी दुपारी साडेबाराला त्यांचे चिकलठाणा विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास ते भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात येणार आहेत. दुपारी तीनच्या सुमाराला रिजिजू हे उस्मानपुरा स्थित भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पक्षाची बैठक घेणार आहेत. क्रीडा भारतीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी ते हेडगेवार रुग्णालयास भेट देणार आहेत. त्यानंतर ते मुंबईला रवाना होणार आहेत.
संपादन - गणेश पिटेकर