Coronavirus : औरंगाबादेतील पुंडलिकनगर हादरले, गंगापूरमध्येही शिरकाव

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

औरंगाबादमध्ये एकूण रुग्ण ५०८

औरंगाबाद : शहरात कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. काल (ता. आठ) दिवसभरात १०० रुग्णांची भर पडली होती. आज (ता. ९) सकाळी १७ तर दुपारी तीन त्यानंतर सायंकाळी 10 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील एकूण बाधितांच्या आकडा ५०८ पर्यंत पोचला आहे. विशेष म्हणजे गंगापूरमध्ये एक रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोनाचा आता ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. दरम्यान, औरंगाबाद शहरातील पुंडलिकनगरमध्ये नव्याने नऊ रुग्ण आढळले. त्यामुळे पुंडलिकनगर हादरले आहे.

शुक्रवारी (ता. आठ) एसआरपीएफ कॅम्पमध्ये तब्बल ७२ जवानांसह १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आझ संजयनगर-६, कटकट गेट-२ ,बाबर कॉलनी -४, भवानीनगर-२, रामनगर-१, सिल्क मिल-१ असिफिया कॉलनी-१ असे १७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.

संबंधित बातमी - वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली

दुपारी यात सातारा परिसर -१, पाणचक्की परिसर-१ पस्तीस वर्षीय महिला आणि जुना बाजार येथील ७५ वर्षीय पुरुष असे तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर सायंकाळी सहाच्यादरम्यान दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यात  गंगापूरच्या जिल्हा परिषद शाळेवरील एक रुग्ण, तर पुंडलिकनगर गल्ली नंबर दोनमधील नऊ रुग्णाचा समावेश आहे. एकूणच दिवसभरात ३० नवीन रुग्णांची भर पडली आहे. कोरोना बधितांचा आकडा ५०८ वरपर्यंत गेला पोचला. खुलताबाद नंतर आता गंगापूरमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे ग्रामीण भागातही सावधान सावधगिरी बाळगावी लागणार आहे अन्यथा याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर
वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

 
बाधित महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म 
कोरोना बाधित असलेल्या ३० वर्षीय महिलेने शुक्रवारी (ता. ८) एका गोंडस मुलीच जन्म दिला आहे. बाळ आणि आई सुखरूप असून आईस कोविड वार्डात हलवण्यात आले आहे, अशी माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिली.

ब्लॉग - अस्वस्थ वर्तमान 

घाटीत ३९ रुग्णांवर उपचार 
घाटीच्या कोविड-१९ रुग्णालयात ३९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ३६ रुग्णांची स्थिती सर्वसामान्य असून, तीन रुग्णांची स्थिती गंभीर आहे, असे घाटी रुग्णालयातर्फे कळविण्यात आले.

 

कोरोना मीटर 

  • उपचार घेत असलेले रुग्ण ः ४६४
  • बरे झालेले रुग्ण ः ३२
  • मृत्यू झालेले रुग्ण ः १२
  • एकूण : ५०८ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Update of Corona At Aurangabad