परीक्षा वेळापत्रकासाठी शासन आदेशाची वाट पाहू - डॉ. येवले

Aurangabad News BAMU
Aurangabad News BAMU

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर परीक्षा होणार की नाही? याबाबतचा संभ्रम उच्च शिक्षणमंत्र्यांनी दूर केला आहे. परीक्षा होणारच असून त्या कधीपासून घ्यायच्या, यासाठी शासनाच्या पुढील आदेशाची वाट पाहण्यात येईल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (ता. सहा) राज्यातील सर्व कुलगुरुंची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. यावेळी कुलगुरुंची मते जाणून घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन परीक्षा घेण्याचे ठरले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर योग्य ती काळजी घेऊन परीक्षा घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थी संघटना, प्राध्यापक संघटना, शिक्षण क्षेत्रातील लोकांनी विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना प्रमोट करण्यात यावे, अशी मागणी केली होती.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

देशभरातील लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत आहे. त्यावेळी परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेबाबतचा निर्णय राज्य शासन कळवणार आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील आदेशाची वाट पाहू. तसेच मंगळवारी (ता. सात) राज्यातील सर्वच कुलगुरूंची व्हिडिओ कॉन्फरन्स राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्‍यारी यांच्यासोबत होणार आहे. अशी माहिती डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com