धोकादायक : जुन्या पैठणची तहान भागविणारा जलकुंभ कोसळण्याची भिती

चंद्रकांत तारु 
Tuesday, 13 October 2020

पैठणला सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र, नव्याचे काम करण्याची मागणी 

पैठण (औरंगाबाद) : शहराला पाणीपुरवठा करणारे नगरपालिकेजवळील जलकुंभ जीर्ण झाले आहे. त्यामुळे जलकुंभ कोसळण्याची भिती नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मंजूर झालेल्या नवीन जलकुंभाचे काम तातडीने सुरु करावे, या मागणीसाठी नगर पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले असून उपोषणला बसण्याचा निर्णय या नगरसेवकांनी जाहीर केला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांची याबाबत भेट घेण्यात आली असून उपरोक्त मागणी करण्यात आली. या जलकुंभाची निविदा जाहिर करण्यात आल्यानंतर जलकुंभ उभारणीचे काम कंत्राटदाराला देण्यात आले. या मंजुरीत शहरातील नवीन कावसन व नाराळा या भागातील जलकुभांचाही समावेश असुन या दोन्ही जलकुंभाच्या उभारणीचे काम सुरु करण्यात आले; परंतु तहसील व नगर पालिका कार्यालयाजवळ असलेल्या जुन्या जलकुभांचे काम मात्र सुरु करण्यात टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जलकुभांतील पाण्याचा पाझर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे जलकुंभ कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या जलकुभांची १५ वर्षापूर्वीच क्षमता संपली आहे. त्यामुळे नवीन जलकुंभ उभारण्याची आवश्यकता असून या कामात कंत्राटदार मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप नगरसेवक तुषार पाटील, हसनोदीन कट्यारे, कल्याण भुकेले, बजरंग लिंबोरे, आबासाहेब बरकसे, ज्ञानेश घोडके, अजित पगारे, अलकाबाई परदेशी, नुजहत टेकडी, महेमुदा शेख यांनी केला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

‘‘जीर्ण झालेल्या या जलकुभांची अवस्था न बघण्यासारखी आहे. यामुळे कोसळण्याचा मोठा धोका वाढला आहे. मंजूर व निधी उपलब्ध असलेल्या या जलकुभांचे काम त्वरीत सुरु करावे अन्यथा उपोषणाचा मार्ग नगरसेवक अवलंबणार आहेत.’’ 
-हसनोद्दीन कट्यारे, नगरपालिका गटनेता तथा शहरध्यक्ष काँग्रेस 

(Edited By Pratap Awachar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water tank of old Paithan became dangerous for fear of collapse