मृत्युदंड विधान : काय असते डेथ वारंट? जाणून घ्या माहिती 

शेखलाल शेख
मंगळवार, 7 जानेवारी 2020

औरंगाबाद : निर्भया अत्याचार प्रकरणातील चार आरोपींना 22 जानेवारी रोजी फाशी देण्यासाठी डेथ वॉरंट निघाले आहे. मात्र हे डेथ वॉरंट म्हणजे नेमके काय असते? त्याची प्रक्रिया कशी असते, याविषयी जाणून घेऊया. 

'कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर-1972' म्हणजे "दंड प्रक्रिया संहिता-1972 (सीआरपीसी)'मध्ये 56 फॉर्म असतात. यामधील 42 नंबरच्या फॉर्मला "डेथ वॉरंट' म्हटले जाते. यावर "वॉरंट ऑफ एग्झिक्‍यूशन ऑफ अ सेन्टन्स ऑफ डेथ' असे लिहिलेले असते. याला "ब्लॅक वॉरंट'सुद्धा म्हटले जाते. डेथ वॉरंट निघाल्यानंतर संबंधित आरोपीला 15 दिवसांच्या आत फाशी देण्याची प्रक्रिया केली जाते. 

पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी

ज्या न्यायालयातील न्यायधीशांनी आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेली असते, त्यांची डेथ वॉरंटवर सहीसुद्धा असते. 

वॉरंट मिळताच जेल प्रशासनाकडून तयारी केली जाते 

डेथ वॉरंट हे जेल प्रशासनाच्या नावाने पाठविले जाते. हे डेथ वॉरंट जेल प्रशासनाला मिळताच त्यांच्याकडून पुढील प्रक्रियेला सुरवात होते. सोबत ज्या आरोपींना फाशी दिली जाणार आहे, त्या आरोपींच्या नातेवाईकांनासुद्धा माहिती दिली जाते. नातेवाईकांनी माहिती दिल्यानंतर त्यांना फाशी देणाऱ्या आरोपींना भेटता येते. 

काय असते डेथ वॉरंटमध्ये? 

फॉर्म नंबर 42च्या विविध कॉलममध्ये फाशी दिल्या जाणाऱ्या आरोपीसंबंधी माहिती असते. यात जेलचा क्रमांक, फाशी देण्यात येणाऱ्या आरोपींची नावे, त्यांची संख्या, केस क्रमांक, डेथ वॉरंट कोणत्या तारखेला निघाले त्याची तारीख, फाशी देण्याची तारीख, फाशी देण्याचा वेळ, फाशी देण्याची जागा असे मुद्दे त्यात असतात. 

कसा तयार होतो फाशीचा दोर- वाचा

तसेच वॉरंटमध्ये हे सुद्धा लिहलेले असते, की जोपर्यंत कैद्याचा मृत्यू होत नाही तोपर्यंत त्याला फासावर लटकावून ठेवावे. कैद्याला फाशी दिल्यानंतर त्याचे मृत्यू प्रमाणपत्र डॉक्‍टरांकडून दिले जाते. हे प्रमाणपत्र नंतर कोर्टात जमा केले जाते. यासोबत डेथ वॉरंट सुद्धा परत केले जाते. 

कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, काय असते पूर्वतयारी - वाचा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What Is Death Warrant Nirbhaya Case Exicution Special News