हे पेय प्रौढांनी पिऊ नये असं म्हणतात, पण...

टीम ई सकाळ
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

  • हरेक जिल्ह्यात खपते दररोज किमान तीन टॅंकर दारू
  • उत्पादन शुल्कचा महसूल वाढता वाढता वाढ

औरंगाबाद : फक्त प्रौढच पिऊ शकतात, किंवा पितात असे एक पेय आहे. अर्थात अल्पवयीन मुलेही काही प्रमाणात लपूनछपून ते पितात, पण त्याला मान्यता नाही. गावोगाव नाक्यानाक्यावर या पेयाची दुकाने आढळतात. पण आपण त्याकडे तोंड वेंगाडून पाहत असलो, तरी ते पिणाऱ्यांची संख्या पहाल, तर डोळे विस्फारतील. 

प्रत्येक जिल्ह्यात अधिकृत देशी दारू दुकाने, परमिट रूम व बीअर शॉपी, ताडी दुकानातून महिन्याकाठी तब्बल किमान 15 लाख लिटर दारूची विक्री होत असते. जिल्ह्यात एवढी दारू रिचवली जाते असे स्पष्ट होते. हातभट्टी, गावठीची विक्रीही बऱ्यापैकी होत असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या कारवायांवरून दिसते.

कोंबड्यांमध्ये खरंच आहे का कोरोना व्हायरस...

उत्पादन शुल्क विभागाचा महसूल दिवसेंदिवस वाढत आहे. फक्त या विभागाकडून महसूल वाढीचा डंका पिटला जात नाही. परंतु दर वर्षी महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आटापिटा केला जातो. प्रत्येक जिल्ह्यात देशी दारू दुकाने आणि परमिट रूमची संख्या वाढत आहे. दुसरीकडे मद्यपींची संख्याही वाढते आहे. पहाटेपासून दुकाने उघडी असतात.

बीडच्या ढोंगी समाजसेवकांना हे तरुण दिसले नाहीत

देशी व विदेशी दारूची दुकाने, परमिट रूम, बीअरशॉपी आणि ताडी दुकानातून दररोज मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. दारूच्या दुकानांचा परवाना मिळण्यासाठी अनेकजण मोठ्या प्रमाणात पैसा ओततात असे चित्र आहे. 

रोजचा विक्रमी खप

अधिकृतपणे दारूचा होणारा खप आश्‍चर्याने तोंडात बोटे घालायला लावणारा आहे. केवळ औरंगाबाद जिल्ह्यात देशी दारूची महिन्याकाठी विक्री १२ ते १५ लाख लिटर होते. म्हणजे दररोज किमान ३० ते ३५ हजार लिटर देशी दारू खपते. दररोज तीन मोठे टॅंकर दारूचा खप. विदेशी दारूचीही तर महिन्याला ३ ते ४ लाख लिटर विक्री होते. तरुणाईचे आकर्षण असलेल्या बीअर विक्रीतून महिन्याला दोन ते तीन लाख रुपयांचा फेस उसळतो.

ट्रक पलटी होऊन 200 बकऱ्या चेंदल्या

तीन प्रकारच्या दारूची बेरीज केली जिल्ह्यात प्रति महिना १५ लाख लिटर दारूचा खप आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अधिकृत दारूबरोबर हातभट्टी आणि गावठी दारूची उलाढालही बऱ्यापैकी होते. पोलिस कारवाईनंतरही दारूविक्री सुरूच असल्याचे दिसते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What Is Very Famous Adult Drink Aurangabad News