पाचशे रुपये काढण्यासाठी महिलांची बँकांमध्ये गर्दी

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 5 April 2020

जनधन बचत खात्यामध्ये प्रत्येकी पाचशे रुपये सनुग्रह अनुदान जमा करण्यात आले आहे. आपल्या खात्यावरील पैसे काढण्यासाठी शनिवारी(ता.४) महिलांनी वेगवेगळ्या बँकेत मोठी गर्दी केली होती. यामुळे सोशल डिस्टन्स इन ठेवणे गरजेचे असतानाही हा नियम कोणीच पाळला नाही. 

औरंगाबाद: भारत सरकारच्या गरीब कल्याण पॅकेज नुसार महिलांच्या जनधन बचत खात्यामध्ये प्रत्येकी पाचशे रुपये सनुग्रह अनुदान जमा करण्यात आले आहे. आपल्या खात्यावरील पैसे काढण्यासाठी शनिवारी(ता.४) महिलांनी वेगवेगळ्या बँकेत मोठी गर्दी केली होती. यामुळे सोशल डिस्टन्स इन ठेवणे गरजेचे असतानाही हा नियम कोणीच पाळला नाही. 

जनधन खात्यात केंद्र सरकारतर्फे पैसे जमा करण्यात आले आहेत. हे पैसे काढण्यासाठी प्रत्येक खातेदारांना वेगवेगळी तारखा देण्यात आले आहे. असे असतानाही महिलां तर्फे बँकांमध्ये गर्दी करण्यात येत आहे. यामुळे बँकांना मध्येही कर्मचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे. लॉक डाऊन असल्यामुळे बँकांमध्ये गर्दी करु नयेत, एका वेळी केवळ पाच ग्राहकांनाच प्रवेश देण्याचं नियम आहे मात्र ग्राहक गर्दी करून हा नियम हे तोडत आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शनिवारी बँक उघडण्या यापूर्वीच काही ग्राहक बँकेसमोर जाऊन बसले होते. व जनधन खात्यात पैसे जमा झालेत का याची बँकेकडे विचारणा करीत होते. अनेकांना आज पैसे मिळणार नसले तरीही त्यांनी बँकेसमोर पैसे येण्यासाठी थांबून होते. 

अनेकांची खाते निष्क्रिय 

जनधन खाते उघडल्यानंतर अनेकांनी त्यात व्यवहारच केला नाही यामुळे हे खाते निष्क्रिय (इनऑपरेटिव्ह) झाले आहेत. 

ह्यामुळे सरकारने दिलेले अनुदान काढण्यासाठी हे खाते सुरुवातीला १०० रुपये भरून ऍक्टिव्ह करावे लागले. ग्राहकाला हे अनुदान मिळाले. यास अनेकांचे खात्यांना आधार लिंक नव्हते हे आधार लिंक ही करण्यात आले असल्याची माहिती पंजाब नॅशनल बँकेच्या सिडको शाखेचे प्रबंधक विलास मांडवेकर यांनी सांगितले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

गर्दी कमी करण्यासाठी बोलवले पोलिसांना 

खात्यावर पाचशे रुपये जमा झाल्यानंतर ते काढण्यासाठी महिलांनी बँक गाठली. मुकुंदवाडी येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखे बाहेर महिलांची मोठी गर्दी झाल्याने बँक कर्मचाऱ्यांना आपली कामात अडथळा निर्माण झाला.त्यामुळे येथे पोलिसांना पाचारण करावे लागले व पोलिसांनी ही गर्दी कमी करत सर्वांना पाच मीटरचे अंतर ठेवत रांगेत उभे केले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

जन धन बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना वेगवेगळ्या तारखा देण्यात आले आहेत. त्या तारखेनुसार आपण बँकेत जावे विनाकारण गर्दी करू नयेत. सर्व बँक नियमित चालू राहिल्यामुळे सर्वांनी आपल्या सोयीने गर्दी न करता बँकेत जाईल जावे ज्यांच्याकडे एटीएम आहे त्यांनी एटीएम चा वापर करून पैसे काढावे असे आवाहन आम्ही सर्वांना करत आहोत. 
- श्रीकांत कारेगांवकर, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Womens crowd in Bank Withdraw JANDHAN Money Aurangabad Money