World Food Day : अन्नाची नासाडी टाळण्यासाठी मोजक्याच वऱ्हाडाचे असावे निर्बंध.

मधुकर कांबळे
Friday, 16 October 2020


गरजूंना पोटभर अन्न मिळण्यासाठी शहरातील संस्था प्रयत्नशील 

औरंगाबाद : जागतिक अन्न दिन शुक्रवारी (ता.१६) साजरा केला जात आहे. जागतिक अन्न दिन हा उपासमारीने पीडित असलेल्यांसाठी जागतिक जागरूकता आणि कृती आणि सर्वांसाठी निरोगी आहार मिळण्याची गरज यांना प्रोत्साहन देतो. गरजूंना पोटभर अन्न मिळावे यासाठी शहरातील काही संवेदनशील संस्था प्रयत्न करत आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

अन्न वाचवा समिती 
लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमातील महाप्रसाद तसेच घरगुती समारंभ दरम्यान अन्न वाचवण्याविषयी जनजागृतीचे काम अन्न वाचवा समिती गेल्या काही वर्षांपासून करत आहे. या समितच्यावतीने पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, लॉकडाऊनच्या काळात लग्नात मर्यादित पाहुण्यांनी उपस्थित राहण्याचा नियम करण्यात आला होता आता अन्नाची नासाडी टाळण्यासाठी हाच नियम कायम करावा. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बॅचमेंटकडून बालकांना सकस आहार 
विनाअनुदानित अनाथाश्रमातील बालकांना सकस आहार मिळावा यासाठी सेंट फ्रान्सिस शाळेच्या काही माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. पुढील दहा वर्षात शहरातील एकाही अनाथाश्रमातील बालक भुकेला राहणार नाही हे उद्दिष्ट ठेऊन राईज अगेन्स्ट हंगर या संस्थेअंतर्गत हे बॅचमेंट प्रयत्न करीत आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉ. हर्षल धाबे म्हणाले, राईज अगेन्स्ट हंगर या उपक्रमाला १९९८ मध्ये अमेरिकेतून सुरुवात झाली. जगात कोणतेही लहान मुल भुकेले राहू नये. त्यांना वाढीच्या अवस्थेत सकस आहार मिळावा यासाठी ही संस्था काम करते. या उपक्रमाबद्दल सेंट फ्रान्सिस शाळेतील माजी विद्यार्थी हातिम यांनी बॅचमेंटना या उपक्रमाची माहिती दिली. डॉ. मेघा राजपूत म्हणाल्या शहरातील निराधार बालकांना सांभाळणाऱ्या मात्र शासकीय अनुदान मिळत नसलेल्या संस्थांना या उपक्रमातून आहार पुरवला जातो. उपक्रमात राहुल पटेल, सोनू कमलानी, दीपक सोनवणे, फिरोजखान, डॉ. सुनील जाधव, सुनील जोगदेव, डॉ. शोएब आदींचा सहभाग असतो. 
 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Food Day Special story