रोजगार बुडाला, नोकरी गेली...पण निराश होऊ नका!

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - कोरोनामुळे अनेकजण खिन्न आहेत. आत्मविश्वास हरवत आहे. ताणतणावात जो तो जगतोय. एकाच वेळी अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. भौतिक स्थिती, बेरोजगारी आणि मानसिक स्थिती या तीन फेजमधून लोक जात आहेत. मात्र, कोरोनाच्या काळात शांत व सृजनशील विचार करण्याची व नव्या संधींचा शोध घेऊन ट्रेंड्सनुसार कार्य करण्याची गरज आहे. रोजगार बुडाला, नोकरी गेली तरी निराश न होता नव्याने सुरवात करणे गरजेचे असल्याचे मत समुपदेशकांनी व्यक्त केले.

नव्या संधींचा शोध घ्या 
कोरोना प्रादुर्भावाच्या काळाआधी ताणतणाव आला तर त्यासाठी पर्याय होते. नाटक, सिनेमा, पर्यटन, मित्रांशी गप्पा या गोष्टी ताण कमी करण्यासाठी आपण करीत होतो; परंतु या कृतीवर कोरोनाच्या काळात मर्यादा आल्या आहेत. या काळात अनेकजणांच्या हाताला काम नाही. रिकाम्या हाती व खिन्न मनाने नुसते बसून राहण्यावाचून काहींना पर्याय राहिला नाही; परंतु हिरमुसून जाऊ नका. हा काळ जाणार आहे व नवीन संधीही निर्माण होणार आहेत. यासाठी मानसोपचारतज्ञ्ज व समुपदेशक डॉ. संदीप शिसोदे यांनी काही टिप्स दिल्या आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

व्यक्तिमत्त्वाचा लागणार खरा कस

  • नोकरी गेलेले, बेरोजगारांनी वेगळ्या क्षमतांनी पुढे यावे. 
  • आता खरा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा कस लागणार आहे. 
  • हे आव्हान म्हणून स्वीकारा, स्वतःचे मायनस पॉईंट शोधा. 
  • त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करा, पैसा जपून खर्च करा. 
  • नवीन संधी शोधून त्यावर काम करण्याची गरज आहे. 
  • दीर्घकाळ टिकेल अशा व्यवसायाकडे वळा. 
  • सेवा सेक्टरमध्ये भविष्यात संधी आहेत. त्यावर लक्ष द्या. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सद्यःस्थितीचा सामना करण्यासाठी... 

  • कशामुळे, कोणत्या विचारांनी ताण वाढतो हे तपासावे. 
  • ध्यानधारणा, फिरणे, व्यायाम, सूर्यनमस्कार घालावेत. 
  • स्वतःसाठी वेळ मिळाला. कोरोनाने सहनशीलता वाढविली. 
  • भावभावना, सकारात्मक विचारांना बळ देण्याची वेळ. 
  • स्वतःला शांत व एकाग्र होण्यासाठीची ही वेळ आहे. 
  • मनातील गोष्टी आप्तेष्ट, कुटुंबीयांशी शेअर करा. 
  • दोन महिने थांबल्याने आयुष्य थांबले असे होत नाही. 
  • स्वतःच्या विचारांवर लक्ष केंद्रित करून रिलॅक्स राहा. 

हे वाचाच... 
माणसांच्या गरजा कमी आहेत. हे आता घरात बसल्याने लक्षात येत आहे. आपला लाईफस्टाईलवर खर्च मोठा आहे. थोडे थांबण्याची गरज होतीच. आतापर्यंत आपण पळतच होतो. शारीरिक व मानसिक व्याधी वाढतच होत्या. जीवनशैलीतील अनियमितता व अनावश्‍यक बदल निसर्गाच्या विरोधातील आहेत, असेही श्री. शिसोदे यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com