पत्नीच्या वादातून तरुणाने संपविले जीवन, औरंगाबादेतील घटना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

पत्नीशी झालेल्या वादातून मजूर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. ही घटना १२ सप्टेंबरच्या दुपारी साडेबारा वाजेदरम्यान उघडसीक आली. किरण दिलीप जाधव (२४, रा. माळीवाडा, चेलीपुरा) असे मृत मजूराचे नाव आहे. पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळल्याने त्याने आत्महत्या केल्याचे किरणच्या आईने सांगितले. 

औरंगाबाद: पत्नीशी झालेल्या वादातून मजूर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. ही घटना १२ सप्टेंबरच्या दुपारी साडेबारा वाजेदरम्यान उघडसीक आली. किरण दिलीप जाधव (२४, रा. माळीवाडा, चेलीपुरा) असे मृत मजूराचे नाव आहे. पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळल्याने त्याने आत्महत्या केल्याचे किरणच्या आईने सांगितले. 

हेही वाचा- एमआयएमच्या माजी नगरसेवकाने साथीदारांच्या मदतीने केला चाकूहल्ला: गुन्हा दाखल 

चेलीपुरा भागातील किरण जाधव हा शहागंज परिसरात एका मेडिकलमध्ये कामाला होता. त्याची आई घरकाम करते. साधारण एक वर्षापूर्वी त्याचा विवाह पुंडलिकनगर भागातील पुजा शिंदे हिच्याशी झाला होता. लग्न झाल्यानंतर सहा महिन्यात त्यांच्यात घरगुती वाद सुरू झाला. त्यामुळे पुजा घर सोडून माहेरी निघून गेली. पुजा मानसिक त्रास देत असल्याने किरण सहा महिन्यांपासून तणावाखाली होता असे त्याच्या आईने सांगितले.

१२ सप्टेंबर रोजी आई कामावर गेली असताना किरण एकटाच घरात होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याने छताला साडी अडकवून गळफास घेतला. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या मिरा लिंगायत आणि सोमनाथ जाधव यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ किरणला घाटीत दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. किरणच्या अकस्मात मृत्यूची नोंद सिटीचौक पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक संतोष पाटे करत आहेत.

हेही वाचामध्य प्रदेशच्या भाचीला ६ वर्षांनी सापडली महाराष्ट्रात मामी, एका फोनवर पोलिसांनी घेतला शोध  

वृध्दाची गळफास आत्महत्या 

औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील मजूर वृध्दाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटनास समोर आली. त्या वृद्धाचा उपचारादरम्यान रविवारी (ता.१३) पहाटे पावणेपाचच्या सुमारास घाटीत मृत्यू झाला असून मधुकर दामोधर साबळे (६५, रा. गल्ली क्र. १६, संजयनगर) असे त्या वृध्दाचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण मात्र समजू शकले नाही.

मधुकर साबळे हे घरात एकटेच असताना त्यांनी ७ सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास छताच्या पाईपला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यांना मुलगा कृष्णा याने घाटीत दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात सहा मुली व एक मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणाचा पुढील तपास जमादार सतीश आहेरकर करत आहेत. 

हेही वाचा- कचऱ्याप्रमाणे व्हेंटीलेटर जिल्ह्यात टाकू दिले, खासदार जलील असे का म्हणाले?

(संपादनः सुषेन जाधव)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young Man Committed Suicide Auranghabad News